व्यापाऱ्यांसाठी खुशखबर : दुकानांच्या वेळा आठ वाजेपर्यंत वाढवणार; नियम कोठे लागू होणार?

285
Udhav-Thakre CM Maharashtra

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढणार असल्याचे सांगून मोठा दिलासा दिला आहे. यासंदर्भात आजच आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. त्यांनी याबाबत सांगलीमध्ये घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील दुकानांच्या वेळा रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. तथापि, ज्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या राज्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ALSO READ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here