Good News Kareena Saif | करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचे आगमन

200
Kareena Kapoor with baby

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.

यापूर्वी 2016 मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

Karina Kapoor गरोदरपणात कायम अ‍ॅक्टिव

करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे. अनेकदा करीना इव्हेंट्सला हजर राहायची. तर कधी पत्रकारांशी ती संवाद साधायची. दोन दिवसांपूर्वीच ती अमृता अरोराच्या प्री ख्रिसमस बॅशमध्ये सहभागी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here