Good News | आता मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑक्सिमीटर शिवाय चेक करा ऑक्सिजन लेव्हल

279
Oxy Meter

कोरोनाच्या रुग्णांना वारंवार ऑक्सिजन लेव्हल जाणून घेणे गरजेचे असते.

कारण ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास, वेळीच रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. त्यामुळेच कोरोना काळात पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली.

ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाल्याने त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु आता एक अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले आहे, ज्याच्यामुळे ऑक्सिजन लेव्हल आता ऑक्सिमीटरशिवाय चेक करता येणार आहे.

मोबाईल अ‍ॅप डेव्हलप

कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप केले आहे, हे अ‍ॅप ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकते.

या मोबाईल अ‍ॅपचे नाव CarePlix Vital असे आहे. या अ‍ॅपद्वारे युजरची ब्लड ऑक्सिजन लेवल, पल्स आणि रेसप्रेशन रेट्स मॉनिटर करण्याचे काम केले जाईल.

युजरला स्मार्टफोनच्या रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर हाताचे बोट ठेवावे लागेल. CarePlix Vital गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरुनही फ्रीमध्ये डाउनलोड करता येणार आहे.

CareNow Healthcare चे को-फाउंडर सुभब्रत पॉल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या मोबाईल अ‍ॅपमध्ये इंटरनल टेक्नोलॉजी फोटोप्लेथिस्मोग्राफीचा (PPG) वापर केला आहे.

पल्स ऑक्सिमीटरद्वारे, लाल रक्त कोशिका (RBCs) किती ऑक्सिजन इथून तिथे घेऊन जातात याची माहिती मिळते.

याला PPO अर्थात पोर्टेबर पल्स ऑक्सिमीटर असं म्हटले जाते. या डिव्हाईसमुळे डॉक्टर, नर्सेस यांना एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे, की नाही हे जाणून घेण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here