Google चे WhatsApp ला टक्कर देणारे चॅटिंग App, जाणून घ्या डिटेल्स !

201

WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर कंपनीवर अनेक स्तरांतून टीका झाली आहे. आता गुगलनेही नवीन चॅटिंग App आणले आहे.

जगभरात Whatsapp इंस्टेंट मेसेजिंग App चा सर्वात जास्त वापर केला जातो. परंतु व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी (Whatsapp Privacy Policy) आणल्याने युजर्संकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा अन्य इंस्टेंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म जसे, सिग्नल, टेलिग्राम मेसेजिंग सारख्यांना फायदा झाला आहे.

परंतु टेलिग्रामला व्हॉट्सअप प्रमाणे यश व लोकप्रियता मिळताना दिसत नाही. परंतु आता गुगलकडून WhatsApp आणि Telegram च्या टक्कर मध्ये Gmail App मध्ये एक जबरदस्त चॅटिंग फीचर दिले आहे.

याचाच अर्थ जीमेल युजर अँड्रॉयड आणि iOS डिवाइस मध्ये Google चॅट अॅपला इंटिग्रेट करू शकतील. जिमेल मध्ये युजर्संना आता मेल सोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग साठी Meet आणि Room चा सपोर्ट दिला जाणार आहे. ज्यात पर्सनल अकाउंटसाठी उपलब्ध केले जाणार आहे.

कसा वापर करावा!

  • गुगलच्या नवीन चॅटिंग फीचरचा वापर करण्यासाठी युजर्संना सर्वात आधी जीमेल App ला अपडेट करावे लागेल.
  • यासाठी अँड्रॉयड युजरला Google Play Store आणि iOS यूजर्सला Apple App स्टोरवर भेट द्यावी लागेल.
  • App अपडेट झाल्यानंतर युजर्संना जीमेल ओपन करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला टॉप लेफ्ट स्क्रीन वर सँडविच बटनवर क्लिक करावे लागेल. यावरून साउंड बार ऑप्शन ओपन होईल
  • यानंतर स्क्रॉल डाउन करून सेटिंग ऑप्शमध्ये जा.
  • या ठिकाणी पर्सनल अकाउंटला सिलेक्ट करावे लागेल.
  • या ठिकाणी तुम्हाला चॅट ऑप्शन दिसेल. याला इनेबल करावे लागेल.
  • यानंतर जीमेल Appला रिस्टार्ट करा.
  • पुन्हा जीमेल App च्या बॉटममध्ये चॅटिंग ऑप्शन दिसेल. या ठिकाणी युजर्संना चॅटिंग करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here