गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा परळीत कोरोना रूग्णांसाठी सेवायज्ञ; पंकजा मुंडेंनी केली घोषणा

473
Gopinath Munde Pratishthan's Seroyagya for Corona patients in Parli; Announcing by Pankaja Munde

आयसोलेशन सेंटरची उभारणी ; बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचा डबा पोहचविणार !

कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत कोरोना रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘सेवा यज्ञ’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या अंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना पाॅझेटिव्ह असलेल्या रूग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारण्याचे तसेच बाधित महिला रूग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंकजा मुंडे व खा.डाॅ.प्रितम मुंडे ह्या दोघीही सध्या क्वारंटाईन आहेत, असे असताना देखील त्यांनी परळी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल बैठक घेऊन संवाद साधला व सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली.

बैठकीस अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोना रूग्णांबद्दल प्रचंड सहानुभूती व सेवा करण्याचा त्यांचा उत्साह यावेळी दिसून आला. यावेळी बोलतांना पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम कोरोना काळात सर्वाना स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

लाखो गेले तरी चालतील लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भावना काहींनी व्यक्त केल्यावर त्यांनी लाखो जगले पाहिजेत आणि पोशिंदाही, त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असे सांगितले.

आगामी काळात कोरोनाला लढा देत असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजसेवा करण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनावे. प्रितमताई यांनी खासदार या नात्याने स्वतः लक्ष घालून कोविड केंद्रात जाऊन रूग्णांना धीर दिल्याचे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोविड काळात रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सेवा यज्ञ सुरू करणार आहे. दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या ३ मे पुण्यतिथी दिनापासून ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ३ जून पुण्यतिथी पर्यंत हा सेवा यज्ञ होणार आहे.

आवश्यकता भासल्यास तो पुढेही चालू ठेवणार आहोत. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तसेच बाधित महिलांच्या घरी जेवणाचा डबा पोहोचविण्यात येईल.

त्याचबरोबर कोविड पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यक आहे, त्यांनाही जेवणाचा डबा देणार असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. ही जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान घेणार असल्याचे सांगताच काही जणांनी देखील या यज्ञात आपापल्या परीने योगदान देऊ असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here