राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पळपुटेपणा करीत आहेत | काँग्रेस नेते भाई जगताप

135

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्यपाल वेळ देऊन चक्क गोव्याला राज्यपाल पळून गेले. कंगणा रनौतला भेटायला गोव्याला जातात ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. 

राज्यपालांनी पळपूटेपणा केला आहे. आम्ही राजभवनावर जाऊन निवेदन देणार आहोत, तेच राजभवनात नाहीत. यावरून सरकारचा हेतू चांगला नसल्याचे दिसत असल्याचे भाई जगताप म्हणाले.

राज्यपालांनी वेळ दिली होती. त्यांनी हा मोर्चा पाहून पळ काढला. आता राजभवनावर जाऊन आम्ही पुढं काय करायचं ते ठरवू असं त्यांनी सांगितले.

सिंघू बॉर्डरजवळ दिल्लीतील दडपशाहीला तोंड देत शेतकरी ठाण मांडून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हे कृषी कायदे शेतकरी विरोधीच आहेत, असं अशोक ढवळे म्हणाले.

आझाद मैदानात अनेक नेत्यांनी या मोर्चाला संबोधीत केले. त्यानंतर हा मोर्चा राज्यपालांचे निवासस्थान राजभवनच्या दिशेने निघाला. पण मेट्रो चौकात पोलिसांनी मोर्चाला आडवले.

यावेळी अनेक शेतकरी आणि राजकीय नेते आक्रमक झाले. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here