लातूर : राज्य निवडणूक आयोग यांनी लातूर जिल्हयातील एकूण 408 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार यांनी राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्देशीत केल्यानुसार तालुका निहाय स्ट्राँग रुम व मतमोजणीचे ठिकाण पूढील प्रमाणे निश्चीत केले आहेत.
तालुका लातूर स्ट्राँग रुम- शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड,लातूर मतमोजणीचे ठिकाण- शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बाशी रोड, लातूर.
तालुका औसा- स्ट्राँग रुम व मतमोजणीचे ठिकाण- प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय परिसर, औसा.
रेणापूर- स्ट्राँग रुम- सुरक्षा कक्ष,तळ मजला, तहसिल कार्यालय, रेणापूर मतमोजणीचे ठिकाण- तळ मजला, तहसील कार्यालय, रेणापूर.
चाकूर- स्ट्राँग रुम व मतमोजणीचे ठिकाण-प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय,परिसर चाकूर.
अहमदपूर- स्ट्राँग रुम व मतमोजणीचे ठिकाण-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड रोड,अहमदपूर.
उदगीर- स्ट्राँग रुम- तहसील कार्यालय,उदगीर पहिला मजला, मतमोजणीचे ठिकाण- तहसिल कार्यालय उदगीर, तळमजला
निलंगा- स्ट्राँग रुम व मतमोजणीचे ठिकाण- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निलंगा.
जळकोट- स्ट्राँग रुम-महसूल हॉल, तहसिल कार्यालय जळकोट, मतमोजणीचे ठिकाण- सभागृह, तहसिल कार्यालय, जळकोट.
देवणी- स्ट्राँग रुम- तहसिल कार्यालय (दक्षिण बाजू), देवणी, मतमोजणीचे ठिकाण-तहसिल कार्यालय देवणी व
शिरुर अनंतपाळ- स्ट्राँग रुम- नायब तहसिलदार (महसूल-1) यांचा कक्ष तहसिल कार्यालय,शिरुर अनंपाळ,
मतमोजणीचे ठिकाण- सभागृह तहसिल कार्यालय, शिरुर अनंतपाळ राहील.
मतमोजणीची वेळ दि.18 जानेवारी, 2021 (सोमवार), रोजी सकाळी 10 वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत राहील याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आदेशीत केले आहे.