Happy Women’s Day from Rinku Rajguru | ‘जिथे स्त्री तिथे घडते जादू’ रिंकू राजगुरूने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा !

354
Rinku Rajguru

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

रिंकूने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात आपल्याला तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे तर बॅकराऊंडला तानाजी या चित्रपटाचे संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत जिथे स्त्री तिथे घडते जादू… असे कॅप्शन तिने दिले आहे.

 

 

रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ तीन तासांत 30 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून रिंकूचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. तसेच ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली असून दररोज एक तरी फोटो ती पोस्ट करत आहे.

 

 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here