लग्न करण्याची मागणी करत महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग करीत तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच तिच्या आईला देखील शिवीगाळ व धमकी दिली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रताप करुणाकर (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 10 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत वेताळनगर आणि परिसरात घडला आहे. आरोपी प्रताप याने पीडित महिलेकडे लग्नाची मागणी केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.
त्यानंतर महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तिला धमकी दिली. पीडित महिलेच्या आईला देखील आरोपीने फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.