अशी आहे प्रक्रिया : जनऔषधी केंद्र सुरु करा | सरकारही करेल मदत

177
Jan Aushadi kendra

प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत सरकार लोकांना स्वस्त दरात औषधे पुरवते.

जन औषधी केंद्राच्या माध्यमातून लोकांना 50 ते 90 टक्केपर्यंत स्वस्त औषधे उपलब्ध करुन दिली जात आहेत.

महागड्या औषधांचा आर्थिक बोजा सहन करणाऱ्या गरिबांना स्वस्त औषधे देण्यासाठी 2015 मध्ये सुरू केलेल्या या योजनेंतर्गत सरकार औषध केंद्राला सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान देत आहे.

ब्युरो ऑफ फार्मा पीएसयू ऑफ इंडिया (बीपीपीआय) देशभरात सार्वजनिक आरोग्य केंद्र चालविते. कोणतीही व्यक्ती किंवा व्यापारी, रुग्णालय, स्वयंसेवी संस्था, फार्मासिस्ट, डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक सार्वजनिक आरोग्य केंद्र उघडू शकतात.

आतापर्यंत देशाच्या विविध भागात 6 हजारांहून अधिक औषध केंद्रे सुरू झाली आहेत. आपले केंद्र उघडण्यासाठी सरकार आपल्याला मदत करते.

दुसरीकडे अर्जदार एससी, एसटी किंवा दिव्यांग असल्यास शासनाने 50,000 रुपयांची औषधे ऍडव्हान्समध्ये दिली आहेत. या योजनेंतर्गत जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराला फॉर्म भरावा लागेल.

https://janaushadhi.gov.in/Data/PMBJKs%20new%20form.pdf या लिंकवर जाऊन अर्ज डाउनलोड करता येईल. हा फॉर्म भरल्यानंतर आपण तो फॉर्ममध्ये दिलेल्या पत्त्यावर सबमिट करा.

त्याशिवाय https://janaushadhi.gov.in/online_registration.aspx या लिंकवर ऑनलाईन अर्ज करता येईल. आपल्या केंद्रातून विकल्या जाणार्‍या सर्व औषधांवर आपल्याला 20 टक्के कमिशन मिळेल.

याशिवाय दरमहा तुम्हाला इंसेटिवही मिळेल, ज्याची मर्यादा 10 हजार रुपये निश्चित आहे. सन 2024 पर्यंत जनऔषधी योजनेचा लाभ प्रत्येक जिल्ह्यात पोहोचविणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here