Highest Paid YouTuber | युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करणारा नऊ वर्षाचा मुलगा

308

युट्यूबच्या माध्यमातून कमाई करण्याच्या बाबतीत त्याचा गेली तीन-चार वर्षे फोर्ब्जच्या यादीत समावेश होतोय.

Highest Paid YouTuber : नऊ वर्षाचं वय तसंही खेळण्याचं असतं. पण इतक्या लहान वयातही काही मुलं आर्थिक कमाई करण्यास सुरु करतात. 

आता असाच एक नऊ वर्षाचा मुलगा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर आहे असं सांगितलं तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. 

रेयान काजी या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षापासून अशा प्रकारे पैसा कमवायला सुरुवात केली आहे. आणि या वर्षी त्यानं थोडं-थोडकं नाही तर तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत.

रेयान युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. गेल्या काही वर्षापासून रेयान आपले व्हिडिओ युट्यूबवर टाकतोय. त्याच्या या व्हिडिओंना युट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळतो, त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

फोर्ब्सने अशा लोकांची यादी प्रसिध्द केली आहे ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई केली आहे. यामध्ये  30 मिलियन डॉलर म्हणजे 220 कोटी रुपयांची कमाई करुन रेयान काजी प्रथम क्रमांकावर आहे.

गेल्या वर्षी 180 कोटींची कमाई

रेयान काजीने गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन जवळपास 26 मिलियन डॉलर म्हणजे 180 कोटी रुपये कमावले होते.

Ryan’s World

रेयान काजीचे युट्यूबवर ‘Ryan’s World’ या नावाने एक चॅनेल आहे. यावर आतापर्यंत त्याने 1875 व्हिडिओ अपलोड केले आहेत.

त्याला लोाकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. Ryan’s World या चॅनेलचे जवळपास 3 कोटी सबस्क्रायबर आहेत. त्याच्या व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळतात. त्यामुळे त्याची कमाई इतकी प्रचंड आहे.

तीन वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ

रेयान टेक्सास मध्ये राहतोय. त्याने 2015 साली केवळ तीन वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता.

रेयान आता स्टोअर बिझनेसमधूनही आर्थिक कमाई करतोय. त्याने वॉलमार्टशी एक डील केली आहे. त्यामुळे त्याला आपले स्वत:चे उत्पादन विक्री करता येते.

खेळण्याच्या वस्तूच्या रिव्ह्यूचे व्हिडिओ रेयान तयार करतो. खेळण्यांचे अनबॉक्सिंग करणे आणि त्याच्याशी खेळणे अशा प्रकारच्या व्हिडिओंना अपलोड केलं जातं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here