जर हिंदू देशभक्त असतात तर … ‘हे’ कोण आहेत | ओवेसी यांचा मोहन भागवतांना सवाल

234

हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘हिंदू देशभक्त’ या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

आपला संताप व्यक्त करताना ओवेशी यांनी लिहिले कि, ‘जर हिंदू देशभक्त असतात, तर मग महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याच्याबाबत आपले काय विचार आहेत ?’ असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

तसेच ‘गांधीजींचा खुनी गोडसेबाबत? नेल्ली नरसंहारासाठी जबाबदार असलेल्या लोकांबाबत, १९८४ च्या शीख दंगलीबाबत आणि २००२ च्या गुजरात नरसंहाराबाबत? भागवत यांनी बोलावे असे आवाहन केले आहे.

असदुद्दीन ओवेसी पुढे लिहितात, ‘भारतीयांचा धर्म कोणताही असो, ते देशभक्त आहेत असे मानने तर्कसंगत आहे. एका धर्माच्या लोकांना देशभक्तीची प्रमाण पत्र वाटली जातात, तर इतरांना आपल्याला येथे राहण्याचा हक्क आहे.

आम्ही भारतीय असल्याचे म्हणण्याचा हक्क आहे हे संपूर्ण आयुष्यभर सिद्ध करत राहावे लागते’ दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदू देशभक्त असतात’ असे म्हटले होते. 

या पुस्तकात महात्मा गांधी यांना हिंदू देशभक्त असे म्हटलेले आहे. मोहन भागवत यांच्या याच वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संस्थापक-संचालक जे. के. बजाय आणि संस्थापक अध्यक्ष एम. डी. श्रीनिवास यांनी The Making of a True Patriot: Background of Gandhiji’s Hind Swaraj पुस्तक लिहलेले आहे.

त्यात ‘महात्मा गांधी हे आमच्या काळातील सर्वात श्रेष्ठ असे हिंदू देशभक्त होते ‘ असे लिहलेले आहे. सदर पुस्तक हे मुख्यत: महात्मा गांधी यांच्या १८९१ ते १९०९ दरम्यान लिहिलेल्या लेखांवर आधारित आहे. 

यात गुजराती भाषेत लिहिलेले त्यांचे हस्ताक्षर देखील आहे.दिल्लीत याच पुस्तकाचे उदघाटन मोहन भागवत यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here