‘हिंदुस्थान जन्नत आहे, पाकिस्तानला कधीच गेलो नाही | गुलाम नबी आझाद

219

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांचा सदस्यात्वाचा कार्यकाळ आज संपला. त्यांना निरोप देताना राज्यसभा गहिरवरली आणि सदस्यही शहराले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासाठी भावुक झालेले दिसून आहे.

आझाद यांनी आपल्या भाषणातून राजकीय कारकीर्द मांडत संपूर्ण राज्यसभा स्तब्ध होती. एक उत्तम राजकीय नेता आणि माणुसकी जपणारा नेता म्हणून संपूर्ण सभागृह त्यांच्याकडे बघत होते.

हिंदुस्थान जन्नत आहे आणि ..

हिंदुस्थान हीच खरी जन्नत आहे. आपला जन्म इथे झाला. आपण भाग्यवान आहोत, हाच आमचा सुरवातीपासून विचार आहे. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला.

पण आज गुगल, यूट्यूबमधून बघता आणि वाचतो, मी आज त्या भाग्यवान नागरिकांपैकी एक आहे जे पाकिस्तानमध्ये कधीच गेले नाही.

पाकिस्तानमधील परिस्थिती वाचतो आणि बघतो तेव्हा मला गर्व होतो आणि अभिमान वाटतो की आम्ही हिंदुस्थानी मुसलमान आहोत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

जगात कुठल्या मुसलमानला गर्व व्हायला हवा असेल तर तो हिंदुस्थानच्या मुसलमानाला व्हायला हवा. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अफगाणिस्तान, इराकपर्यंत मुस्लिम देश एकमेकांमध्येच भांडत आहेत.

तिथे ना हिंदू आहेत ना ख्रिश्चन तरीही ते आपसात लढत आहेत. जीवन संपवत आहेत. इतर देशांमध्ये मुस्लिमांमध्ये ज्या कुप्रवृत्ती आहेत, त्या हिंदुस्थानातील मुस्लिमांमध्ये नाहीत आणि खुदा न करे त्या कधीच येऊ नयेत.

हे आम्ही गर्वाने सांगू सांगतो, असं आझाद म्हणाले. तसंच बहुसंख्यांनीही दोन पावलं पुढे येण्याची गरज आहे. त्यानंतर १० पावलं पुढे गेलेले असतील, असं आवाहन आझाद यांनी केलं.

हीच अल्लाह आणि देवाला प्रर्थना 

काश्मीरमधील जनता दहशतवादात गेल्या कित्येक वर्षांपासून होरपळत आहे. गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेतील या जनतेच्या भावनांना वाट मोकळी केली. हे सांगतांना आझाद भावुक झाले अन् त्यांना अश्रू अनावर झाले.

  • त्यांच्या भावना पाहून संपूर्ण राज्यसभाही शहारली. ‘अल्लाह से… भगवान से… यही दुआ करते हैं कि इस देश से आतंकवाद खत्म हो जाए।’ असं भावना अनावर झालेल्या आझाद यांनी म्हणताच राज्यसभेत पंतप्रधान मोदींसह सर्व सदस्यांनी बाकं वाजून त्यांना अभिवादन केलं. 

  • काश्मीरमधील दहशतवादात भारतीय लष्कराचे जवान, पोलिस, सुरक्षा दलांचे हजारो जवान शहीद झाले. एवढचं नव्हे तर शेकडो काश्मिरी नागरिक चकमकीत ठार झाले. हजारो मुली आणि माता आज विधवा आहेत. ठार झालेल्यांमध्ये त्यांचे पती किंवा दहशतवादी मुलाचा समावेश असेल. पण आज त्या दुःखी आहेत. यामुळे काश्मीरमधील स्थिती सामान्य व्हावी, ही प्रार्थना करतो, असं आझाद म्हणाले.

‘माझ्या काश्मिरी पंडीत बंधु, भगिनींसाठी हा एक शेर’

काश्मीरमध्ये शिक्षण घेत असताना विद्यापीठांतील विद्यार्थी निवडणुकांमध्ये विजयी होत होतो त्यात शंभर टक्के मतं ही माझ्या काश्मिरी बंधु, भगिनींची होती. मित्र आहेत माझे अनेक जण. आज ते सर्व विखुरलेले आहेत.

त्यांना जेव्हा मी भेटतो त्यावेळी खूप वाईट वाटतं. माझे वर्ग मित्र आणि मित्र. माझा हा एक शेर त्या काश्मिरी मित्र आणि मैत्रिणीसाठी. काश्मिरी पंडितांसाठी. ज्या माता, भगिनी विधावा झाल्या त्यांच्यासाठी, असं सांगत आझाद भावुक झाले.

‘गुजर गया वह जो छोटा सा एक फसाना था, फूल थे, चमन था, आशियाना था, न पूछ उजड़े नशेमन की दास्तां, न पूछ थे चार तिनके, मगर नाम आशियाना तो था।’ ती घरं पुन्हा उभी करावी आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

‘दिल ना उमीद तो नही, नाकाम ही तो है’

सभागृहाला निरोप देताना आझाद भावुक झाले. त्यांनी एक शेर सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘दिल ना उमीद तो नही, नाकाम ही तो है. लंबी है गम की शाम, शामही तो है’, असं आझाद म्हणाले. हिवाळ्यात संध्याकाळ मोठी असते.

सूर्य तर उगवणारच आहे. यामुळे या संध्याकाळचा आनंद घेऊया, असं आझाद म्हणाले. बदलेगा न मेरे बादभी मुझुए गुफ्तगु, मै जा चुकाहूंगा फिरभी तेरी मैफील मे रहुंगा, असं म्हणत त्यांनी राज्यसभेतील सर्व सदस्यांना भावनिक साद घातली.

पंतप्रधान मोदींशी राजकीय आणि वैयक्तीक संबंध

आपला वाढदिवस आसो, ईद असो की कुठलाही आनंदाचा क्षण असो पंतप्रधान मोदींचा फोन येतोच. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मोदी या दोघांचे फोन आपल्याला येतातच.

फक्त राजकीय नाही तर मोदींनी वैयक्तीक संबंधही जपले आहेत. अशा वैयक्तीक हितसंबंधांमुळे आपण भावुक होतो. माझे संबंध विरोधकांशी सुरवातीपासूनच राहिले आहेत. कारण आपण मिळूनच देश चालवू शकतो.

लढाई करून आणि शिवीगाळ करून चालणार नाही. आपलं म्हणणं आपण भाषणातून मांडू शकतो. यामुळे माझे सर्व बेंच मेट, पंतप्रधान मोदी, शरद पवारांपासून ते यादवजींपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार मानतो.

राज्यसभेचे सचिव आणि सचिवालयाकडूनही कायम सहकार्य मिळाले. आपण पुढेही भेट राहू. सर्वांसाठी एक शेवटचा शेरही आझाद यांनी म्हटला.

‘नही आएगी याद तो बरसो नही आएगी. मगर जब याद आओगे तो बहुत याद आओगे’. आझाद यांच्या या शेरला पंतप्रधान मोदींसह संपूर्ण सभागृहाने दाद दिली आणि त्यांना निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here