लोक पोर्न मुव्हिज पाहतात अन लग्नानंतर जोडीदाराकडून तशाच प्रकारच्या फिजिकल रिस्पॉन्सची अपेक्षा करतात तर मुली या बॉलिवूड मुव्हिज पाहतात आणि लग्नानंतर नवऱ्याकडून तशाच प्रकारच्या इमोशनल रिस्पॉन्सची अपेक्षा करतात, पण वास्तवात घटस्फोटांची बीजे तिथेच रुजली जातात.
कारण जीवन हे सिनेमा नसून वास्तव असते, राजकारणात ही काहीसं असंच झालंय, भाजपच्या कुंपनावर थांबून स्वतःला तटस्थ असा शिक्का लावून घेणाऱ्यांना भाजपने ग्रामपंचायत ते दिल्ली अशी कुठली ही निवडणूक पराभूत होता कामा नये असा समज झाला आहे.
भाजप जिंकली की मोदी अन हिंदुत्वाच्या बढाया मारत कॉलर टाईट करणं अन पराभव झाला की अमित शाह,देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका करणं हे त्यांचं नित्याचे झालं असून अश्या दुतोंडी गांडूळानीं प्रथम निवडणूका काय असतात त्या समजून घ्याव्यात.
भाजपात बाहेरची लोकं आली यावरून ही काकणं फोडून घेणाऱ्याना सांगू इच्छितो, संदीप नाईक तिकीट नाही, गणेश नाईक विजयी, शिवेंद्रसिंह राजे विजयी, कालिदास कोलंबकर विजयी, वैभव पिचड पराभव, राधाकृष्ण विखे पाटील विजयी, हर्षवर्धन पाटील पराभव, चित्रा वाघ तिकीट नाही, जयकुमार गोरे विजयी, राणाजगजीतसिंह पाटील विजयी, राहुल नार्वेकर विजयी, सिद्धराम मेहत्रे विजयी, नितेश राणे विजयी, बबनराव पाचपुते पराभव, रणजितसिंह मोहिते तिकीट नाही, गोपीचंद पडळकर पराभव, सुरेश धस विजयी हा सक्सेस रेट असेल तर इन्कमिंग झालं अन अन्याय झाला म्हणून छाती बडवून घेणाऱ्या तटस्थ म्हणवून घेणाऱ्यांनी या वर अभ्यास करावा.
भारत भालके, अब्दुल सत्तार, सुनील तटकरे, कृपाशंकर सिंह, बबनराव शिंदे, रामराजे निंबाळकर, दिलीप सोपल, संग्राम जगताप यासह डझनभर जिंकून येणाऱ्या लोकांना भाजप मध्ये न घेता स्थानिक भाजप नेत्यांचा विचार केला होता.
जिथं भाजप कमी तिथं इन्कमिंग झालंच पाहिजे अन्यथा पक्ष कसा वाढेल यावर ही कुंपणावर असलेल्यांनीं विचार करावा. दुसरी गोष्ट तावडे, खडसे, मेहता, बावनकुळे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना तटस्थ व्यक्त करतात पण विनोद तावड़े यांचे वादग्रस्त निर्णय व वक्तव्य, नाथाभाऊ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीचे फोन प्रकरण व भोसरी एमआईडीसी प्रकरण, प्रकाश मेहता यांचे बिल्डर प्रकरण, तर चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या तिकीट कापन्याचा संदर्भ पंख कापण्याशी जोडला. कुणी ठेकेदारीसोबत जोडून पाहिला, कुणाला तो आर्थिक व्यवहाराशी निगडित वाटला तर कुणाला राजकारणाचा बळी वाटला, अगदी तसेच बावनकुळे बाबतीत मी ही साशंक आहे.
काही वादग्रस्त कारणामुळे व निगेटिव्ह इमेज मुळे केंद्र सरकार मध्ये खांदे पालट व गच्छतीं ही झाली होती त्यात अनेक मोठे अर्थात स्मृति इराणी, उमा भारती, जयंत सिन्हा, राजीव प्रताप रूडी या नेत्यांच्या बाबतीत पहायला मिळाली होती, तर तोच निर्णय राज्यात ही लागू करण्यात आला असावा.
राज्यात आधीच्या काँग्रेस-एनसीपी सरकारने जे काही उद्योग केले तेच पुढे सुरू ठेवायचे असतील तर मग नव्या सरकारची गरजच काय होती. महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रकांत दादानीं थोडंस तोंड कुठं, किती, अन कश्यासाठी उघडावं यावर लक्ष देण्याची गरज आहे. उगीच काहीतरी बोलून नंतर एक्स्प्लेन करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवस यूटर्न घेण्यात वाया घालवणं इष्ट नाही. कारण अग्रेसिव्ह बोलून नंतर शेपूट हलवण्यापेक्षा तो अग्रेसिव्हपणा जनतेत जाऊन तिथं दाखवणं योग्य राहील.