गुन्हेगारांसोबत फोटोवर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

281

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत सराईत गुन्हेगारांचा फोटो व्हायरल झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अखेर अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद शहरात एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांच्यासोबत काही गुन्हेगारांनी फोटो काढला होता. या फोटोत गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एकाने 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे तर दुसऱ्यावर  बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे तर अन्य एकावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

  • अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘काही दिवसांपूर्वी मी औरंगाबाद दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यात गेल्यावर हजारो लोकं भेटायला येतात, निवेदन देतात. यात कोण कुठून आला, त्याचा काय व्यवसाय आहे, हे माहीत राहत नाही, त्यामुळे हा प्रकार घडला असावा’ असं अनिल देशमुख म्हणाले. तसंच, झालेला प्रकार पुढ टाळण्यासाठी नक्की काळजी घेईल, असंही देशमुख म्हणाले.

यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री  आर.आर. पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता.

भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला होता. मात्र, येथे गुन्हेगारांच्या मध्येच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहेत हे गुन्हेगार?

कलीम कुरेशी – गुटखा किंग म्हणून याची ओळख आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

  • सय्यद मतीन – याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहे. तसंच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.
  • जफर बिल्डर-  याच्यावर 500 ट्रक चोरून सुटे भाग करून विकणाऱ्या टोळीतला हा गुन्हेगार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here