हनी ट्रॅपची व्याप्ती वाढली | हनी ट्रॅपमध्ये अनेकजण अडकलेले असण्याची शक्यता !

648

नगर येथील हनी ट्रॅपची व्याप्ती वाढू लागली आहे. या हनी ट्रॅप मध्ये अनेक जणांना ब्लॅकमेल करण्यात आले असावे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे! 

नगर तालुक्यातील हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये गुरुवारी पोलिसांनी हिंगणगाव येथील बापू बन्सी सोनवणे यास अटक केली आहे. (Honey trap increased | Many are likely to be trapped in a honey trap)

त्याच्याकडून त्याच्या आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान या गुन्ह्यातील महिलेसह दोन जणांची पोलीस कोठडी 24 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हिंगणगाव येथून बापू बन्‍सी सोनवणे यास पोलिसांनी अटक केली आणि त्याची फॉर्च्युनर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

बापू सोनवणे हा व्यावसायिक असून तो या कामात महिलेला ‘सर्वप्रकारची मदत’ करण्यात पुढे होता असे आढळून आल्याने ह्या प्रकरणाचे धागे दोरे दूरवर पोहचल्याचे दिसते आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप मध्ये सावज अडकवून लुटनाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आरोपींची अनेक अनैतिक दुष्यकृत्ये समोर आली आहेत. या टोळीची प्रमुख महिला पैशाचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वतःची एक टोळी तयार केली होती.

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या सावजाला बंगल्यात बोलावून घ्यायची, आणि त्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचीजबाबदारी या तरुणांवर होती.

नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले व सागर खरमाळे यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अमोल मोरे याचे केडगाव चौकात किराणा दुकान असून तो आरोपी महिलेचा खास पंटर असल्याचे समजते. सचिन खेसे याचेही नगर तालुक्यातील हमीदपूर येथे किराणा दुकान आहे.

या महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला क्लासवन अधिकारी हा देखील हमीदपूर येथीलच असल्याचे समजते. हे चौघेही अनेक दिवसांपासून एकमेकाच्या संपर्कात होते.

26 एप्रिल रोजी सदर महिलेने ‘व्यावसायिकाला’ घरी बोलल्यानंतर त्याचे अमोल मोरे यांनी व्हिडिओ चित्रीकरण केले होते. 1 मे रोजी क्लासवन अधिकार्‍याला अडकवण्यात या चौघांचा समावेश होता.

महिलेच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाला सदर महिला गोडीगुलाबीने संबंध वाढवायची आणि त्याननंतर शरीरसंबंधासाठी उद्युक्त करत होती. जेव्हा सदरील महिला ‘शरीर संबंध’ स्थापित करायची, तेव्हा तिचे साथीदार या खाजगी क्षणाचे व्हिडिओ चित्रीकरण बाथरूममध्ये लपून करीत होते.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेच्या हनी ट्रॅप मध्ये नगर शहरातील एक क्लास वन अधिकारी देखील अडकल्याची खळबळजनक बाब समोर आलेली आहे.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सदर महिलेसह तिच्या चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पीडित अधिकाऱ्यानेच स्वतः पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आह.

त्यावरून पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह तिचे साथीदार सचिन भिमराज खेसे राहणार हमीदपूर तालुका नगर, अमोल सुरेश मोरे राहणार कायनेटिक चौक नगर, महेश बागले व सागर खरमाळे दोघेही राहणार नगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत, आत्तापर्यंत सदर महिला व खेसे यांना 15 मे रोजी अटक करण्यात आलेली आहे

आरोपी महिलेने सदर अधिकाऱ्यास 1 मे रोजी दुपारी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलून घेतले. यावेळी अधिकार्‍यास शरीर संबंध करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडिओ पूर्ण होतात सदर महिला व तिच्या साथीदारांनी अधिकाऱ्याला ‘तीन कोटी रुपये आणून दे नाही तर तुझा हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली.

यावेळी अधिकाऱ्याच्या गाडीत असलेले तीस हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून देखील घेण्यात आले, तसेच त्यानंतर अधिकाऱ्याकडून ऑनलाईन 50 हजार रुपये आरोपींनी त्यांच्या नातेवाईकाच्या खात्यावर मागून घेतले.

त्यानंतर देखील ही महिला सातत्याने त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून पैशासाठी त्रास देऊ लागली. ‘तीन कोटी रुपये दे नाही तर गुन्हा दाखल करेन’ अशा स्वरूपाचे ब्लॅकमेलिंग तिने सुरु केले.

दरम्यान अशाच पद्धतीने केलेल्या ब्लॅकमेलिंग प्रकरणात ही महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांच्याविरोधात 15 मे रोजी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. सदर महिलेने इतर कोणाची फसवणूक केली असल्यास पीडित व्यक्तींनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात असे पोलिसांनी आवाहन केले होते.

त्यावरून पीडित अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क केला आणि त्याच्यासोबत झालेली घटनाक्रम कथन केला आहे. जखनगाव येथे राहणाऱ्या या तीस वर्षीय महिलेच्या गुलाबी जाळ्यात एक श्रीमंत व्यावसायिक अडकल्याचे समोर आल्यानंतर एका क्लास वन अधिकाऱ्याचे प्रकारही समोर आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान ही महिला व तिच्या साथीदारांनी नगर तालुक्यातील आणखी किती जणांना अशाच पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवले आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत. याच पद्धतीने इतरही काही जणांची फसवणूक या महिलेने केली असल्यास पीडित व्यक्तींनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी महिला ही आधी श्रीमंत व सहज जाळ्यात सापडेल अशी व्यक्ती हेरायची आणि त्यांच्याशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर सुखाचे आमिष दाखवत होती.

समोरचा व्यक्ती एकदा महिलेच्या आमिषाला भाळला की त्यानंतर त्याला कसे ट्रॅप करायचे याचा प्लॅन तयार केला जात होता.

पुढील नियोजन पूर्णपणे ठरलेले असायचे, सावज व टार्गेट केलेल्या व्यक्तीला घरी बोलावून त्याला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले जायचे, याच वेळी घरात लपलेले तिचे साथीदार या घटनेचा व्हिडीओ बनवायचे आणि बनवलेल्या व्हिडिओचा आधार घेऊन ब्लॅकमेलिंग सुरू करायचे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

श्रीमंतांना ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना आरोपीच्या मोबाईल मधून मिळाले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात आणखी तक्रारदार वाढून या प्रकरणातील आरोपी देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित महिलेकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी न घाबरता समोर यावे त्यांची नावे व ओळख लपवून ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

क्लास वन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने अहमदपूर येथून सचिन खेसे याला अटक केली आहे.

या गुन्ह्यातील फरार आरोपी खरमाळे व बागले यांचा शोध सुरू असून खरमाळे हा एका पोलिस कर्मचाऱ्यांचा भाऊ असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे पोलीस यापुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण ?

नगर जिल्ह्यातील जखणगाव येथील महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने आधी गोड बोलून धनिक व्यावसायिकाला तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले होते.

त्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करून त्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. नगर तालुक्यातील जखणगाव इथे गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.

पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्यांनी फिर्यादीकडून उकळलेला सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्त केला आहे. शहरातील एका धनिकाला आपल्याला अडकविले जात आहे, हे लक्षात आल्यावर त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याची माहिती दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही काळातच गुन्ह्याची उकल करून त्या महिलेसह तिचा साथिदार अमोल सुरेश मोरे (वय ३०, रा. कायनेटीक चौक, नगर) याला पकडले. फिर्यादीच्या सांगण्यानुसार २६ एप्रिल रोजी ही घटना घडली.

मोरे व त्या महिलेने संगनमत करून फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढले. त्या महिलेच्या घरात नेऊन शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. फिर्यादीकडील रोख रक्कम, सोन्याची साखळी, आंगठ्या असा सुमारे पाच लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला होता.

त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी दे, अन्यथा या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करू, अशी धमकी द्यायला सुरवात केली.

शेवटी फिर्यादीने पोलिसांना गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे कसून चौकशी केल्यावर तिने आणि मोरे या दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे आढळून आले.

फिर्यादीला पुरते अडकविण्याची योजना आरोपींनी आखली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने विरोध करताच त्याला चाकूचा धाक दाखविण्यात आला. जास्तच विरोध केला तर त्याला बांधून ठेवण्यासाठी दोरीही आणून ठेवली होती.

महिलेने तिच्या वाट्याला आलेले दागिने आपल्या भावाच्या नावे एका भिंगार अर्बन बँकेत गहाण ठेवले होते. तेही पोलिसांनी ताब्यात घेतले. बाकीचा मुद्देमाल तिच्या आणि साथिदाराच्या घरातून हस्तगत करण्यात आला होता.

सदर महिलेने याच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले होते, त्यानुसार आणखी एका क्लास वन अधिकाऱ्याने महिलेच्या विरोधात फिर्याद दिली.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, आर.एन. राऊत, बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here