हनीमूनला गेलेली विवाहिता तासनतास फोनवर बोलायची | पतीला संशय आला आणि ..

223
honeymoon

ग्वाल्हेर : विवाहात पती पत्नीचा परस्पर विश्वास महत्वाचा असतो. जर पतीच्या डोक्यात संशय पिशाच्च शिरला तर गुन्हा अटळ असतो.

पतीचा पत्नीवर संशय बळावला आणि गुन्हा घडल्याची घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. काही दिवसांपूर्वी भूमि-अभिलेख खात्यात सहायक लेखा अधिकारी असलेल्या सूर्या हिचा मृतदेह सापडला होता.

महिला अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तिच्या डॉक्टर पतीवर पोलिसांना संशय होता. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याचा पती डॉ. संजय सिंह यानेच तिची गुरुवारी गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह २४ तास एका खोलीत ठेवला होता.

शुक्रवारी त्यानेच स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी सूर्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पत्नीचा मृतदेह खोलीत ठेवल्यानंतर त्याने फ्रीजमधून बर्फ काढून मृतदेहावर ठेवला होता.

त्यानंतर दुर्गंधी येऊ नये म्हणून संपूर्ण रात्रभर खोलीत फ्रेशनर मारला होता. यूट्युबवर पाहून त्याने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो जागेच्या शोधात दिवसभर शहरात फिरला. शुक्रवारी त्याने मृतदेह एका गोणीत भरला आणि स्कूटरवर घेऊन तो कलेक्ट्रेट रोडवर मेट्रो टॉवरजवळ आला आणि तेथील झुडुपांत मृतदेह फेकला.

मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना आणि पतीला माहिती दिली. सर्व जण घटनास्थळी पोहोचले.

पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून दिला

शुक्रवारी त्याने मृतदेह एका गोणीत भरला आणि स्कूटरवर घेऊन तो कलेक्ट्रेट रोडवर मेट्रो टॉवरजवळ आला आणि तेथील झुडुपांत मृतदेह फेकला. मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला.

बहिणीने पटवली ओळख

जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना आणि पतीला माहिती दिली. सर्व जण घटनास्थळी पोहोचले.

सूर्याची बहीण अनामिकाने अंगठी आणि चेनमुळे तिची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पतीची चौकशी केली. पतीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय

डॉक्टर आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. लग्नानंतर हनीमूनला गेले होते. त्याचवेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करत होती.

सतत फोनवर तासनतास बोलायची. पतीने तिला अनेकदा रोखले. यावरून गुरुवारी त्यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here