कोरोना व्हायरस : नवीन व्हेरियंट ‘झीटा’ किती घातक आहे; त्याबद्दल जाणून घ्या!

329

कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरियंट सापडत आहेत. रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

आता अजून एक नवीन व्हेरियंट आढळून आल्याचे पुण्यामधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने एका संशोधनात म्हटले आहे.

ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नाकातून आणि गळ्यातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हा व्हेरियंट आढळला आहे.

याबाबत वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्री-प्रिंट संशोधन अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या BioRxiv मध्ये म्हटले आहे.

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियापासून ते माध्यमांमधील वृत्तांमधून विविध शंका व्यक्त करण्यात येत आहेत. हा व्हेरियंट किती धोकादायक आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

नवीन व्हेरियंटचा उगम

डॉ. प्रज्ञा यादव यांनी म्हटले की, या कोरोना व्हायरसचा B.1.1.28.2 व्हेरियंट सगळ्यात आधी एप्रिल 2020 महिन्यात ब्राझीलमध्ये आढळला होता.

त्यांनतर ब्राझील आणि ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांच्या घशातून आणि नाकातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमधून हा व्हायरस मिळाल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने म्हटले आहे.

WHO ने हा एक महत्त्वाचा व्हेरियंट असल्याचे म्हटले आहे. हल्लीच या व्हेरियंटला ‘झीटा व्हेरियंट’ असे नाव देण्यात आले आहे.

Sars CoV2 च्या जीनोमिक सर्व्हेलन्सनुसार ब्रिटन (डिसेंबर 2020) आणि ब्राझील (जानेवारी 2021) मधून भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवशांच्या नमुन्यांमध्ये व्हेरियंट B.1.1.28.2 आढळला होता.

या दोन्ही प्रवाशांना हा संसर्ग होण्याआधी कोणताही आजार नव्हता आणि संसर्ग झाल्यापासून ते संसर्गातून बरे होईपर्यंत त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

नवीन व्हेरियंटचा धोका

कोरोना व्हायरसच्या इतर सगळ्या व्हेरियंट्सप्रमाणेच संशोधक या व्हेरियंटलाही महत्त्वाचा मानत आहेत.

पण काही माध्यमांनी हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट इतकाच धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here