लसीकरणासाठी पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी कशी करावी? काय आहेत ‘नियम’

273

देशामध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. बहुप्रतिक्षित असलेले हे लसीकरण टप्याटप्याने देण्यात येत आहे. आता पर्यंत आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांचे लसीकरण झाले आहे. 

यापुढे ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षे वयाच्या गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. १ मार्च पासून या दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

आजच्या लेखातून आपण लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी नाव नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही पद्धत पूर्ण समजून घेतल्यानंतर तुम्हीही करून पाहा.

तीन पध्दतीने नोंदणी करता येईल. co-WIN 2.0 App, आरोग्यसेतु App किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येते. सर्वात आधी तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP दिल्यानंतर तुमचे अकाउंट तयार होईल.

यामध्ये तुम्ही तुमचे किंवा कुटुंबातील लोकांची नोंदणी करू शकता. एक व्यक्ती ४ जणांची नोंदणी करू शकते. नाव, वय, लिंग याची माहिती भरा आणि ओळखपत्र अपलोड करा. ओळखपत्रात आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR स्मार्ट कार्ड किंवा फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्र, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चालू शकते.

नाव नोंदणी कोण करू शकते

  • ४५ ते ५९ या वयोगटात असल्यास आजाराबाबतचे डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आजारासंबंधित माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुमचं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं वय ६० वर्षे किंवा पुढे असेल तर तुम्ही नाव नोंदवण्यास पात्र आहात.
  • साधारणपणे वय वर्षे ६० असलेल्या व्यक्तींना काही ना काही आजार असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत चालू औषधांमुळे लसीकरणासाठी नोंदणी करावी की नको याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबतीत डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की साठीच्या पुढे लोकांना काही ना काही आजार असतातच.
  • Suspicious death of Mansukh Hiren | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लसीकरण केंद्रावर डॉक्टरांकडून लसीकरणापूर्वी चाचणी केली जाते आणि मगच लस दिली जाते. त्यामुळे साठीच्या पुढच्या लोकांनी कोविड लसीकरणासाठी नोंदणी करावी हे उत्तम!
  • त्यानंतर जवळचे केंद्र निवडा. वेळ आणि दिनांक निवडून तुम्ही त्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकता. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येईल.
  • रेफरन्स आयडी मिळाल्यावर लसीकरण प्रमाणपत्रही तुम्ही घेऊ शकता. लसीकरण झाल्यावर मोबाईलवरही ते SMS द्वारे डाउनलोड करता येईल.
  • पहिल्यांदा लस मिळाल्यानंतर दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जातो.
  • ज्यांना ऍप वरून नोंदणी शक्य नाही ते प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही नोंदणी करू शकतात. १५०७ हा क्रमांकही नोंदणीसाठी उपलब्ध आहे. सरकारी इस्पितळात ही लस मोफत आहे. खासगी रुग्णालयात ही लस २५० रुपयांत उपलब्ध आहे. अजूनही लसीकरण केंद्र वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • आधीच्या co-WIN App मध्ये तांत्रिक अडथळे आल्याने co-WIN 2.0 App हे नव्याने अपडेट करून आले आहे. त्यातही काही अडथळे आल्यास आयटी टीम व अधिकारी ते दूर करतील. हे App नव्याने सुरू झाले आहे. दुसरा टप्पाही लवरकात लवकर यशस्वी होईल अशी आशा करूया.
  • अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लसीकरण सुरु झालेले आहे. नव्याने वाढणारे कोरोनाचे रुग्ण आता कमी होतील अशी आपण आशा करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here