आपला मोबाईल नंबर True Caller लिस्ट मधून कसा काढाल? जाणून घ्या !

628
Truecaller

Truecaller एका अशी साईट किंवा अ‍ॅप आहे. ज्याच्या वर कॉल करणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, लोकेशन, सिम कोणत्या कंपनीची आहे हे समजते.

बऱ्याच वेळा आपल्याला आलेल्या नंबरचे काहीच समजत नाही की तो कॉल कोणत्या नंबर वरून आणि कुठून आला आहे.

ट्रू कॉलर एवढी चांगली सेवा देऊन देखील बऱ्याच अडचणींमुळे ट्रू कॉलर वरून आपल्याला नंबर काढून घ्यावा लागतो.

कारण काही लोक त्या नंबर वरून बनावटी फेसबुक किंवा व्हाट्स अप अकाउंट बनवून गैर वापर करतात.

आपल्याला या अडचणी पासून वाचायचेTruecaller असल्यास, ट्रू कॉलर वरून आपला नंबर कसा काढता येईल जाणून घेऊ या.

सर्वप्रथम ट्रू कॉलर च्या //www.truecaller.com/unlist संकेत स्थळावर क्लिक करा.

  • नंतर unlist मोबाईल नंबरचे पेज उघडेल या मध्ये काही पर्याय असतील.
  • या मध्ये contry ची निवड करावयाची आहे आणि ज्या नंबरला ट्रू कॉलर लिस्ट मधून काढावयाचे आहे. तो अधिकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करावयाचा आहे.
  • नंतर captcha घाला आणि खालील दिलेल्या unlist बटणावर क्लिक करा. आता अशा प्रकारे मोबाईल नंबर ट्रू कॉलर मधून काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
  • आता पुढच्या 24 तासात आपला क्रमांक ट्रू कॉलर च्या डेटाबेस मधून काढून टाकण्यात येईल. आणि एखाद्याने आपला मोबाईल नंबर शोधल्यावर त्याला ” No Result ” असे मिळेल अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर ट्रू कॉलर मधून काढू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here