दिल्ली : आज दिल्ली येथील लीला अंबिन्स हॉटेल मध्ये कॉमन वेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी, मकौंगा, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डी.लीट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) आणि मॅनेजमेंटमध्ये साइन्स या विषयात डी.एस.सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) या दोन सर्वोच्च पदव्या ऑनररी देऊन (दि.27) मालदीवचे शिक्षण मंत्री डॉ अब्दुल्ला रशीद अहमद यांच्या शुभ हस्ते आणि सी.बी.एस.ई.चे सचिव अनुराग त्रिपाठी यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे लातूर चे उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून २०१४-२०१९ मध्ये लोकसभा मध्ये उत्तम कामगीरी केली असून ते अनेक विषयांत पदवीधर आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मधून मास मीडिया जर्नालिझम च्या बी. एम. सी.जे. आणि एम. ए. एम. सी. जे आणि ,एम. बी. ए.( मार्केटिंग) पी. एच. डी.(मॅनेजमेंट साइन्स) डिग्री पूर्ण केली आहे.
त्यांच्या या योगदानामुळे त्यांचा या सर्वोच्च पदव्या देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या अनेक पदव्या मध्ये या दोन पदव्यांची भर पडली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.