मुंबई : शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 जंयतीनिमित्त राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
भाजप नेते नारायण राणेंनी आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदराजली, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
भाजप आणि शिवसेनेने युती केली तेव्हा नारायण राणेंना शिवसेनेकडून मुख्यमंत्री बवनण्यात आलं होतं. नारायण राणेंनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून केली होती.
Narayan Rane
@MeNarayanRane
हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजंली… #BalasahebThackeray
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच टीका-प्रतिटीका होताना दिसतात. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जातं.
ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष बळकट आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच, असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.