अनैतिक संबंधात नवऱ्याचा झाला अडथळा | प्रियकराच्या मदतीने लावळा जीवघेणा ‘सापळा’

318
Husband becomes an obstacle in immoral relationship

रामगड: झारखंडच्या रामगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वकील अजय कुमार महतो यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजय कुमार महतोची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या अजय कुमार महतोला प्रियकराच्या मदतीने पत्नी विराजो देवी उर्फ ​​सुमन यांनी ठार मारले. अनैतिक संबंधांमुळे हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, अजय कुमार महतोची पत्नी आणि त्याचा मावस भाऊ हेमंत कुमार यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महतो यांना हे प्रकरण समजले.

त्या क्षणी तिला हे प्रेमसंबंध तोडून टाकण्यासाठी धमकावले, समजाऊन सांगितले मात्र याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. यानंतरही बिनबोभाटपणे त्यांचे प्रेम प्रकरण चालूच होते. ‘

अजय कुमार महतो यांच्यावरील दोनदा हत्येसाठी हल्ला करण्यात आला. परंतु हत्येचा प्रयत्न दोनदा अयशस्वी झाल्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून महतो आपली पत्नी सुमनवर पाळत ठेवून होता. त्यामुळे बायकोला असे वाटू लागलं की त्यांच्या प्रेमात तो एक मोठा अडथळा आहे. त्यानंतर सुमनने तिच्या प्रियकरच्या मदतीने महतोच्या हत्येचा कट रचला. पण त्याच्या हत्येचा प्रयत्न दोनदा अयशस्वी झाला.

अजय कुमार महतो 4 एप्रिल रोजी सुभाष चौकातील मंदिरात भजन-कीर्तन करून रात्री 11 वाजता कोठार चौकातील कृष्णा पॅलेसजवळ पोहोचले. तो तिथे दबा धरून बसला होता.

अजय चौकात येताच हेमंतने आपल्याबरोबर आणलेला मोठा दगड अजय महतोच्या डोक्यात घातला व जखमी केले. त्यानंतर हेमंतने धारदार चाकूने गळा चिरून तो दुचाकीवरुन निघून गेला. तो पळून जात असताना त्याने रेल्वेच्या क्रॉसिंगजवळील एका झाडीत चाकू फेकला.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला असता, पत्नीने तिच्या प्रियकरच्या मदतीने अनैतिक संबंधातून महतोची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here