पतीला कॉल केला आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने स्वत:वर झाडली गोळी

233
The husband called and the forest ranger shot himself

धारणी (अमरावती) : मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (३२) यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली.

हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, सदरील घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला.

तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले हादरले.

राजेश मोहिते यांनी लगेचच दीपाली यांच्या आईला फोन केला. त्यांच्या आईने मुलगी दीपाली यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, पलीकडून फोनला प्रतिसाद मिळाला नाही.

तेव्हा मोहिते यांनी तातडीने हरिसाल येथील एम.एस. बिरगोने, ज्योती बिरगोने, संजीव डिकार व महिला वनरक्षक बिसनन यांच्याशी संपर्क साधून त्यांना शासकीय निवसास्थानी जायला सांगितले.

सर्वजण त्यांच्या घरी क्वार्टरला गेले असता, क्वार्टरची दारे आतून बंद होती. दार तोडून आत गेल्यावर दीपाली चव्हाण या रक्तबंबाळ अवस्थेत पलंगावर कोसळलेल्या स्थितीत आढळून आल्या.

त्यांची रिवॉल्वरदेखील बाजूला पडलेली होती. त्यांनी छातीच्या उजव्या भागावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here