एका स्त्रीसाठी पती, सासरा हे घरचे कर्ते पुरुष आणि आधार असतात. हे आधार जर माणुसकीला विसरून नात्याला काळीमा फासणार असतील तर नाते आणि नात्यावरील विश्वास उडून जातो.
मुंबईत अशीचं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नी पकडून ठेवले, तिचे हात पाय दाबून धरले आणि सासर्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायाने आरोपींविरोधात जामीन अर्ज फेटाळला आहे.
सविता आणि प्रशांत (नाव बदलेले) दोघांचे 8 जुलै 2019 रोजी लग्न झाले होते. लग्नापूर्वी प्रशांत सविताच्या 20 लाख रुपयांचा हुंडा घेतला होता. लग्नानंतर सगळे आलबेल होईल अशी स्वातीची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही.
प्रशांतने लग्नानंतर सविताशी शारिरीक संबंध निर्माणच केले नाही. नंतर प्रशांत नपुंसक असून तो उपचार घेत असल्याचे समोर आले.
त्यानंतरही प्रशांत आणि त्याच्या वडिलांनी स्वातीवर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव आणला. सविताने या गोष्टीला नकार दिल्याने प्रशांत त्याचा भाऊ आणि वडिलांनी मिळून तिला मारहाण केली.
22 जानेवारी 2020 रोजी प्रशांत, त्याचे वडील आणि भाऊ सविताच्या खोलीत शिरले. प्रशांत आणि त्याच्या भावाने सविताला धरून ठेवले.
तेव्हा प्रशांतच्या वडिलांनी तिला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिले. सविता बेशुद्ध झाली आणि प्रशांतच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला.
नंतर काही दिवसांनी प्रशांतने सविताला माहेरी पाठवले, तसेच जर तुम्ही हुंडा नाही दिला तर सविताला परत सासरी घेऊन जाणार नाही अशी धमकीही दिली.
शेवटी सविताने झाला प्रकार बहीणीला सांगितला. तेव्हा हिंमत दाखवून सविताने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.