बायकोला प्रियकरासोबत पतीने ‘आक्षेपार्ह’ अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि भयंकर घडले!

745
Drugs worth Rs 2 crore seized in Mumbai Son of biggest drug supplier arrested

विवाहबाह्य संबंधातून चांगले फार कमी घडते. कारण पाप कधी लपत नाही आणि जेव्हा पाप उघडे पडते तेव्हा त्या पापात वाटेकरी कोणी होत नाही, जो पाप करतो त्याला पश्चातापाशिवाय दुसरे काही मिळत नाही.

विवाहबाह्य संबंध आणि ते लपविण्यासाठी हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना मुंबईत दहिसर पूर्व इथे समोर आली आहे.

सदर घटनेचा खुलासा एका सहा वर्षाच्या चिमुकलीने केला आहे. तिच्या आईने मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. विशेष म्हणजे चिमुकल्या मुलीला गप्प बसण्यासाठी आईने व तिच्या प्रियकराने धमकावले होते.

मात्र घटनेच्या 11 दिवसानंतर मुलीने दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून बाहेर काढण्यात आला आहे. नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे तर तिचा प्रियकर सध्या फरार आहे.

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचे 2012 मध्ये शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते.

रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तर, त्याची पत्नी सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच गृहिणी म्हणून संसार करीत होती.

या दरम्यानच्या काळात शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत शाहिदाची ओळख झाली, ओळखीचे मैत्रीत व मैत्रीचे नाते विवाहबाह्य संबंधात बदलले.

ही गोष्ट वाऱ्यासारखी कानोकानी पसरत गेली आणि तिचा पती रईसला हे प्रकरण समजले. तेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला. पत्नीवर संशय घेऊ लागला व तिच्या प्रियकराला रोखू लागला, भांडू लागला.

तेव्हा आपल्या प्रेमाच्या अडथळ्याला दूर करण्याचा डाव दोघांनी रचला. त्यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता.

अकरा दिवसाआधी शाहिदा आणि अमित अनैतिक संबंधात गुंग असताना अचानक रईस घरात आला. त्याने दोघांना रंगेहात पकडले आणि गोंधळ करू लागला. आपल्या रस्त्यातील काटा दूर करण्यासाठी संधी शोधणाऱ्या शाहिदा व तिच्या प्रियकराने काटा काढला.

यावेळी दोघांनीही घरात असलेल्या चाकून रईसचा गळा कापला. याच दरम्यान सहा वर्षाची चिमुकली अचानक आपल्या अडीच वर्षाच्या भावासोबत घरात आली. तेव्हा आईने तिला धमकी दिली, की कोणाला काही सांगितल्यास तिला देखील वडिलांप्रमाणेच मारुन जमिनीत पुरेल, त्यामुळे घाबरून मुलगी गप्प बसली.

दरम्यान खान कंपाउंडमध्येच राहाणाऱ्या रईसच्या एका मित्राने तो बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली. दुसरीकडे शाहिदाने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या शरीराचे चार तुकडे करत त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्याजवळ ठेवला.

गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यास शाहिदा सांगायची की रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे, मात्र तिची ही लपवाछपवी फार काळ टिकली नाही. शेवटी तीन दिवसांआधी गावाहून रईसचा भाऊ खान कंपाउंडमधील रईसच्या घरी पोहोचला.

याचवेळी संधी मिळताच सहा वर्षाच्या मुलीने आपल्या चुलत्याला आईच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलची सगळी माहिती दिली. यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना ही सगळी घटना सांगितली.

अखेर पोलिसांनी स्वयंपाकघरातील जमिनीत पुरलेला चार तुकड्यांचा मृतदेह बाहेर काढला आहे आणि पत्नीला अटक केली आहे, तर तिचा प्रियकर सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here