पती, पत्नी और ओ : विवाहानंतर पत्नीचे परपुरुषावर प्रेम, पतीनेच स्वतः लावून दिले लग्न !

899
Husband, wife and O: Wife's love for other man after marriage, marriage arranged by husband himself!

भागलपूर : समाजात लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोचे अन्य व्यक्तीवर प्रेम झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातून अनेक अपराध घडले आहेत.

विवाहानंतर बायकोला एखाद्या परपुरुषावर प्रेम झाल्याने, नवऱ्याने त्याग करून आपल्या बायकोचे लग्न ‘तिच्या प्रियकरा सोबत’ लावण्याची अनोखी घटना समोर आली आहे.

लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर दोन लेकरांच्या आईला एका परपुरुषासोबत प्रेम झाले. जेव्हा पतीला कळले तेव्हा त्याने कसलाही आकांडतांडव न करता, अतिशय समंजसपणा दाखविला आहे.

आपल्या बायकोच्या भावनांची कदर करून चक्क तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले, या घटनेची माहिती मिळताचं परिसरात बघ्यांची एकच गर्दी उडाली होती.

संबंधित घटना बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंज येथील आहे. खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सपना कुमारी या महिलेचे सात वर्षांपूर्वी सुल्तानगंज याठिकाणी राहणाऱ्या उत्तम मंडल याच्याशी झाले होते.

विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण कालांतराने संबंधित विवाहित महिलेचे नात्यातील एका अन्य युवकावर प्रेम झाले. त्यानंतर त्यांची जवळीक आणखी वाढत गेली.

आपल्या पत्नीचे एका वेगळ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पतिला मिळाली. त्यानंतर त्याने पत्नीचा विरोध केला. दोघांत अनेकदा भांडणही झाली, पण सपनाने संबंधित युवकासोबत आपले प्रेमसंबंध चालूच ठेवले.

याला घरच्यांनी आणि नवऱ्याने सतत विरोध केला पण सपनाने कोणाचेही ऐकले नाही. त्यामुळे पत्नीच्या हट्टासमोर पतीने गुडघे टेकून तिच्या दुसऱ्या लग्नाला सहमती दिली आहे. त्याने राजू कुमार नावाच्या आपल्या नात्यातील प्रियकर युवकासोबत लग्न लावून दिले आहे.

सुल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात झालेल्या या लग्नात दोन्ही बाजूच्या परिवाराने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी संबंधित महिलेची दोन लेकरेही लग्नात उपस्थित होते तर नवऱ्याच्या डोळ्यात अश्रूही होते.

मात्र त्याने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर त्याग करून तिचे लग्न परपुरुषासोबत लावून दिले आहे. या अनोख्या पद्धतीचे लग्न गावातील मंदिरात होते असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

त्यामुळे गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वाद देखील दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here