पत्नीच्या मैत्रिणीसोबत नवऱ्याचे ‘अफेअर’ | चिडलेल्या पत्नीने नवऱ्यासोबत मैत्रिणीला धू-धू धुतले

309
Love Affiair

पती पत्नी हे एक विश्वासाचं नात असते, त्यात तिसरीची एन्ट्री झाली कि नात्याला आणि संसाराला ग्रहण लागते. त्यातून पती पत्नीच्या नात्याला तडा जातो.

सूत्रांच्या माहितीनुसार, विनोद आणि प्रांजली (बदललेले नाव) हे दोघेही उच्चशिक्षित युवक आणि युवती असून काही वर्षांपूर्वी त्यांची फेसबुकवर एकमेकांशी ओळख झाली.

दोघांनी मैत्री केल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही कुटुंबीयांच्या सहमतीने 2008 ला प्रेमविवाह केला. विनोद हा एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता तर प्रांजली ही देखील खासगी कंपनीत काम करीत होती.

प्रांजलीच्या कंपनीत तिची पिंकी नावाच्या युवतीशी ओळख झाली. पुढे जाऊन पिंकी आणि प्रांजली चांगल्या जिवलग मैत्रिणी झाल्या. काही दिवसांनी प्रांजलीने पती विनोदशी पिंकीशी ओळख करून दिली.

तेव्हापासून ती दोघांचीही फॅमिली फ्रेंड झाली. एका वर्षानंतर विनोदची बदली मुंबईला झाली. त्यामुळे प्रांजली आणि विनोद मुलासह मुंबईला राहायला गेले.

दरम्यान पिंकीला देखील मुंबईत जॉब मिळाला मात्र मुंबईत कोणी परिचयाचे नसल्याने पिंकी प्रांजली व तिचा पती यांच्यासोबतच त्यांच्या घरी राहू लागली.

त्यादरम्यान विनोद आणि पिंकीचे प्रेम बहरत गेले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची प्रांजलीला खबरही नव्हती.

नोकरीतून बदली झाल्यामुळे विनोद आणि प्रांजली पुढे नागपुरात आले. त्यापाठोपाठ पिंकी देखील नागपुरला आली. निव्वळ योगायोग असेल असे समजून प्रांजलीने याकडे दुर्लक्ष केले

पुढे विनोदची बदली नाशिकला झाली त्यानंतर पिंकी देखील नाशिकला गेली. आता मात्र पत्नी प्रांजलीला संशय येऊ लागला होता. तिने नवऱ्याला नागपूरला येऊन व्यवसाय करण्यास सुचवले.

त्यानुसार विनोद नागपूरला आला आणि फायनान्सचा व्यवसाय सुरु केला. विनोद आता बायकोच्या रडारवर होताच मात्र इकडं बायकोने त्याचा मोबाईल तपासला असा त्याला धक्काच बसला. त्यानंतर तिने विनोदवर आणखी लक्ष केंद्रित केले.

पतीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागलेल्या प्रांजलीने विनोदला ऑफिसला जाऊ दिले, मात्र त्याच्या पाठोपाठ ती भाऊ आणि बहिणीसोबत तिथे पोहचली. त्यावेळी कॅबिनमध्ये चक्‍की पती आणि पिंकी अश्‍लील चाळे करताना आढळून आले.

तसेच पिंकीच्या पर्समध्ये आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या. त्यामुळे चिडलेल्या प्रांजलीने पिंकीचे केस धरून धुलाई सुरु केली. तिचा बचाव करण्यासाठी आलेल्या पतीच्याही कानशिलात लगावली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.

पतीची प्रेयसी असलेल्या आपल्या ‘जुन्या’ मैत्रिणीला देखील तिने केस धरून फरफटत मारहाण केली. नागपूरमध्ये घडलेल्या ह्या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.

चिडलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या वेण्या पकडून चांगली धुलाई केली. प्रेयसीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीलाही मार खावा लागला. शेवटी हे प्रकरण अजनी पोलिस ठाण्यात पोहोचले असून पोलीस तपास सुरु आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here