मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण, मी मी आहे | ट्रोलर्सला वनिताचे सणसणीत उत्तर

236

अभिनेत्री वनिता खरात तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 

वनिताच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिने केलेल्या न्यूड फोटाशुटमुळे एकिकडे तीचं सेलिब्रेटींकडून कौतुक होत आहे तर दुसरीकडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

मात्र, तीने ट्रोलर्सना चपराक लगावणारे ट्विट करत पुरुषांनी पुरुषांच्या चुकीच्या वृत्ती सुधारण्यासाठी कृती केली असती तर आपण समाज म्हणून अधिक यशस्वी झालो असतो असे म्हटले आहे.

काही दिवसापूर्वी वनिताने कोणताही न्यूनगंड न बाळगता एका कॅलेंडसाठी न्यूड फोटोशुट केले. तिचा न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या फोटोशूटची एकच चर्चा सुरू झाली.
वनिताने स्वत: हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत १४ हजार ४८२ लोकांनी लाईक केला आहे, तर १ हजार १०० जणांनी कमेंट्स दिल्या आहेत.

महिलांचे कपडे, हसणे, बोलण्याऐवजी, जीवनशैलीवर भाष्य करण्याऐवजी आणि त्यांच्या घराबाहेर पडण्याचा वेळ पाहणे – घरी येणे… जर पुरुषांनी पुरुषांच्या चुकीच्या वृत्ती सुधारण्यासाठी कृती केली असती तर आपण समाज म्हणून अधिक यशस्वी झालो असतो. असे मत तिने सुरू असणाऱ्या ट्रोलिंगवर व्यक्त केले आहे. 

काय आहे वनिताच्या फोटोमध्ये? 

वनिताने एका हातात निळ्या पतंगाचा आडोसा घेत न्यूड फोटोसाठी पोझ दिली आहे. तिने हा फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केले असून फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी हा फोटो काढला आहे.

#BodyPositivity असा हॅशटॅग वापरत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. वनिताने आपल्या फोटोबरोबर एक पोस्टही लिहिली आहे की, ‘मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे.

कारण, मी मी आहे.’ (I am proud of my talent, my passion, my confidence, I am proud of my body… because I am ME…!!!”) त्याचबरोबर, बॉडी पॉझिटिव्हीटी चळवळीत सहभागी व्हा. अशीही कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

(Let’s get together to join this Body Positivity Movement) तिचा न्यूड फोटो आणि दिसून येणारा स्थूलपणा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. ट्रोल करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. पण, तिचे कौतुक मात्र सोशल मीडियावर होताना दिसतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here