विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला : नितेश राणेंची टीका

278

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण विधानसभेतले नसून चौकातलं भाषण होतं, असे वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा ‘कॉमेडी सम्राटा’चं भाषण असा उल्लेख नितेश राणे यांनी केला आहे. “आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! “कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच सुधीर मुनगंटीवर यांनी केलेल्या भाषणाची “नटसम्राट पाहातोय की काय” अशी टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा धागा पकडून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण ‘कॉमेडी सम्राट’ भाषण असल्याचं म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here