‘बाबांचा हा वाढदिवस कधीच विसरू शकत नाही’ इरफान खानच्या बर्थडेला बाबिलने केली भावुक पोस्ट

196

मुंबई : जर आज इरफान खान आपल्यात असता तर त्याचे जगभरातले चाहते त्याला वेगळ्या भावनेने शुभेच्छा देताना दिसले असते. गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी इरफान खानचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं.

आज (७ जानेवारी) हा त्याचा वाढदिवस आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मुलगा बाबिलने एक व्हिडिओ पोस्ट करून खास मेसेजही लिहिला आहे.

बाबिलने लिहिले की, हा वाढदिवस मी विसरणार नाही

बाबिलने लिहिले की, ‘तुम्ही कधीही लग्न, जन्म याचा उत्सव करावा या विचारसरणीचे कधीच नव्हता. कदाचित म्हणूनच मला कोणाचा वाढदिवस लक्षात राहत नाही कारण तुम्हाला कधी माझा वाढदिवस लक्षात राहिला नाही.

तुम्ही माझा वाढदिवस लक्षात रहावा म्हणून कधी उत्साह दाखवल्याचंही मला आठवत नाही. बाहेरच्यांना हे कितीही विचित्र वाटत असलं तरी आमच्यासाठी ते अगदीच सर्वसामान्य होतं.’

https://www.instagram.com/p/CJePMX8Ax6S/?utm_source=ig_web_copy_link

‘आम्ही दररोजचा दिवस साजरा करायचो. आई नेहमी आपल्याला वाढदिवसाची आठवण करून द्यायची. पण आजचा तुमचा वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.

आज तुमचा वाढदिवस आहे बाबा. तंत्रज्ञानात कमकुवत असलेल्या सर्व पालकांसाठी खास प्रेम.. पाहा ते मला अजूनही सांगत आहेत की त्यांना माझी आठवण येते.

व्हिडिओमध्ये इरफान खानची पत्नी सुतापा आणि त्यांचा छोटा मुलगा अयानदेखील दिसत आहे. बाबिल बर्‍याचदा आपल्या वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो.

नव्या वर्षाचं स्वागत करतानाही त्याने इरफान खानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. इरफानची पत्नी सुतापाही त्याच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here