Aadhaar Card हरवले किंवा चोरीला गेले तर चिंता करू नका, १५ दिवसांत नवीन आधार कार्ड मिळवा !

149
If Aadhaar Card is lost or stolen, do not worry, get a new support card in 15 days!

आपले आधार कार्ड कधी कधी अनावधानाने हरवते. त्यानंतर नवीन आधार कार्ड कसे मिळवायचे, त्याची प्रोसेस काय आहे, याची अनेकदा आपल्याला माहिती नसते. परंतु, आधार कार्ड हरवले तर चिंता करू नका. १५ दिवसांत नवीन आधार कार्ड मिळू शकेल, कसे ते पाहा.

पुन्हा एकदा आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. याची प्रोसेस UIDAI ने खूपच सोपी केली आहे. आता युजर्संना UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर आधार कार्ड पुन्हा एकदा डाउनलोड करता येऊ शकते.

असे डाउनलोड करा आधार कार्ड

सर्वात आधी UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइट https://eaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
यानंतर टॉपवर तुम्हाला आधार डाउनलोड करण्याचे तीन ऑप्शन दिसतील.

पहिल्या ऑप्शनमध्ये १२ डिजिटचा आधार नंबर टाका. दुसरा एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल. आणि तिसरा व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल.

यानंतर यात कोणताही आयडी किंवा नंबर टाकून आधार कार्ड पुन्हा एकदा डाउनलोड करता येऊ शकतो.
डिटेल भरल्यानंतर इमेज मध्ये देण्यात आलेले कॅरेक्टर्सला टाइप करा. आणि पुन्हा सेंट ओटीपी वर क्लिक करा.

हे वन टाइम पासवर्ड तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. जो आधार कार्ड मध्ये नोंद आहे. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर आधार नंबर एसएमएस द्वारे तुम्हाला मिळेल.

आता मोबाइल नंबर वर ओटीपी टाका. पुन्हा सर्व झाल्यानंतर आधारची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्यासाठी व्हेरिफाइड अँड डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर आधार कार्डची ई-कॉपी सहज डाउनलोड होणार आहे.

घरी मागवू शकता आधार कार्ड

थोडी रक्कम मोजून तुम्ही याची प्रिंट पुन्हा मागू शकता. ही पद्धत जाणून घ्या.
UIDAI च्या ऑफिशियल वेबसाइट https://eaadhaar.uidai.gov.in/ वर जा.

आता My Aadhaar सेक्शन मध्ये Get Aadhaar चे ऑप्शन दिसेल.

याच्या खाली देण्यात आलेल्या पर्यायात Retrieve Lost or Forgotten EID/UID पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
आता एक नवीन पेज ओपन होईल. त्यात काही डिटेल्स भरा.

तुम्हाला आधार कार्ड नंबर, नामांकन संख्या, पूर्ण नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर सारखी माहिती भरावी लागेल.
जर तुम्ही फोन नंबर देऊ इच्छित नसाल तर तुमचा इमेल वापरू शकता.

आता तुम्हाला CAPTCHA नोंद करावा लागेल. त्यानंतर सेंड ओटीपी किंवा Send TOTP पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.

आता एक पेमेंट गेटवे पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला ५० रुपयांचे शूल्क भरायचे आहे.

पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्पीड पोस्टाने १५ दिवसांत आधार कार्डची एक हार्ड कॉपी दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here