कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजप पक्षावर जोरदार टीका केली. एका खासगी कार्यक्रमासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते.
देवेंद्र फडणवीस इस्लामपूरमध्ये येत आहेत मात्र ते स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि पक्षाला स्थिरस्थावर करण्यासाठी येत आहेत. अनेक वेळा ते आले आहेत आणि बोलून गेले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.
‘खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही’
राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.