मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगल्याच आरोप-प्रत्यारोपांच्या सामना पाहायला मिळाला.
विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता जास्त दिवस विरोधी पक्षांमध्ये राहायचं नाही. त्यावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
-
“शिवसेना आणि भाजपमध्ये त्या बंद खोलीत काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही. मात्र, सव्वा वर्षे झाली आणि अमित शहा आज बोलताहेत.
-
शेतकरी, महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांवरून लोकांना विचलित करण्याचं काम भाजप नेहमीच करत आले आहे. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोरील प्रश्नांकडे लक्ष द्यावे”, असही सल्ला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिला.
नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. ते फक्त बोलण्यात एक्सपर्ट आहेत. मी भविष्यकार नाही, ते जास्त पाहतात.
जर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाले तर महाराष्ट्रातून भाजप संपुष्टात येईल”, असा इशाराच नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे.