मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्या सुरू असलेल्या कोरोना उद्रेक आणि राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांवर चर्चा केली.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, राज्यात कठोर लॉकडाउन झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल आणि त्याचे गंभीर परिणाम सर्वाना भोगावे लागतात.
लॉकडाउन नको असेल तर नागरिकांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की एकीकडे राज्यात करोना वाढत आहे आणि दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कमी होत आहे. राज ठाकरे यांनी रूग्णालयात बेड मिळत नसल्याचा आणि बेड असले तरी दिले जात नसल्याचा थेट आरोप केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोरोना महाराष्ट्रात वाढण्याचे दोन कारण समजावून सांगितले. राज यांनी ही कारणे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहेत व कारवाई करण्याचे सुचवले आहे.
काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला, परंतु ते होम आयसोलेट आहेत. कारण त्यांच्या आजूबाजूला कोविड रूग्ण आहेत. यासठी ते भेटू शकले नाहीत. झूमच्या माध्यमातून कोविड आणि लॉकडाउनबाबत चर्चा झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे
- उत्पादनासंदर्भात : छोट्या उद्योगांना उत्पादन करण्यास सांगितले गेले आहे पण विक्री करण्यास मनाई आहे, तसे असल्यास उत्पादन कोठे ठेवायचे, विक्री करायची नसेल तर उत्पादन का करावे? यावर मी त्यांना सांगितले की दोन किंवा तीन दिवस विक्री चालू ठेवा. लहान व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकान सुरू करण्याची परवानगी द्या
- बँकांना सक्ती करा : बर्याचजणांनी मोठी आणि लहान कर्ज मिळवले. पैसे बँकांकडे गेले पाहिजेत, परंतु जर लोकांकडे पैसे असतील तर ते बँकेत जाईल. ती जबरदस्तीने वसूल केली जात आहे. 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन आहे, मग लोकांनी पैसे कसे भरायचे?
- पुण्यातला थरार | लेडी डॉनने साथीदारांच्या मदतीने केली प्रियकराचीच हत्या, धारदार शस्त्राने केले वार
- वीज बिल : एकूण लॉकडाऊन दरम्यान वीज बिल माफ करा.
- व्यवसाय कर : व्यापाऱ्यांना जीएसटीवर सूट द्या, यासाठी राज्याने केंद्राशी बोलणे आवश्यक आहे
- आउटसोर्स कामगार : लॉकडाऊनच्या धावपळीत सरकारने हंगामी कामगारांना कामावर घेतले होते, परंतु नंतर काढून टाकले. हे योग्य नाही, त्यावर कायम तोडगा आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री म्हणाले की या सूचना योग्य आहेत आणि मंत्रिमंडळाशी या विषयावर बोलण्याचे आश्वासन दिले आहे.
- जिम आणि सलून देखील दोन ते तीन दिवस सुरू ठेवण्यास काय हरकत आहे. त्यांना रोजगार मिळेल व लोकांची सोय होईल.
- स्वीमिग पूल बंद : राज्यातील खेळाडूंना सवलती देण्याची गरज आहे. पूल असो वा अन्य खेळ त्यांना आधार दिला पाहिजे. बॉडीबिल्डर्सना जिममध्ये सराव करण्यासाठी जिम सुरु केले पाहिजेत, फक्त योग्य काळजी घेतली गेली पाहिजे.
- शेतकर्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकरी कोसळल्यास आणखी एक मोठे संकट येईल. ते संकट येण्याआधी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
- शेवटची सूचना शाळा बंद आहेत, परंतु शाळेची फी वसूल केली जात आहे. शाळांमध्ये फीस आकारू नका, अर्धी फीस घ्या, सवडीने घ्या. सक्ती करू नका, हे संकट सर्वांसाठी आहे.
- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करा. परीक्षा न देता उत्तीर्ण करा. त्यांची मानसिकता आपल्याला माहित नाही. ही मुले लहान आहेत, त्यांना कोठे अभ्यास करावा, परीक्षा कशी घ्यावी हे माहित नसते. त्यांना आता संधी दिलीच पाहिजे.
- शालेय विद्यार्थ्यांना बढती दिली तशी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बढती द्या.
राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणाबद्दलही भाष्य केले. जर भाजप सरकार पाडण्याचे काम करीत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविरोधात प्रकरणे बाहेर कशी येत आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण न आणता राज्यापुढे असलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे.