मराठा आरक्षणाचा खेळ केलात तर आम्ही गप्प बसणार नाही : छत्रपती संभाजीराजेंची गर्जना

310
If we play game of Maratha reservation, we will not remain silent: Chhatrapati Sambhaji Raje's roar

रायगड : तुम्ही जर मराठा आरक्षणाचा व समाजाचा खेळ खेळत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. मी धीर धरत आहे, मी आजपर्यंत सहन केले आहे, पण आता मी गप्प बसणार नाही, यापुढे जे घडेल ते पाहून घेता येईल, अशी गर्जना राजसदरेवरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

मराठा समाजाला आंदोलन पुकारण्याची वेळ आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना संभाजी राजे म्हणाले की, मराठा समाजाचे आंदोलन राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून 16 जूनपासून सुरू होईल.

कोरोना बाधित रुग्णवाढ मंदावली, दोन महिन्यांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद

रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजी राजे यांनी आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाहीअसा इशारा देत त्यांनी 16 जूनपासून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

इतर सर्व समाजाला आरक्षण आहे पण मराठ्यांना ते नाही

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी नेहमीच बहुजन समाजाचा मुद्दा उपस्थित करत आलो आहे.” मी नेहमी रायगडावर राजनैतिकहेतूने कधीच बोलत नाही. मी राजकारणी नाही. राजकारणाला जवळ येऊ देत नाही. परंतु समाजाचे नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठा समाज आज सर्वात वाईट परिस्थितीतून जात असताना मी बोलायचे नाही?

मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीवर राज्य केले. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजातील बहुजन समाजाला आरक्षण दिले. आज इतर सर्व समाजाला आरक्षण आहे पण मराठ्यांना आरक्षण नाही. तरीही आम्ही आवाज उठवायचा नाही. 2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढीत आहे. आम्ही आमच्या हक्कांची मागणी केली आहे.

तरीसुद्धा लोकांना वेठीस धरता का?

बहुजन समाज ज्या मागण्यासाठी झगडत आहे, त्याच बहुजन समाजासाठी बाहेर पडलो. अनेक आंदोलने केली. पण दुर्दैवाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.

मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा भाजप सरकार सत्तेत होते, तेव्हा आघाडी सरकारने काहीही केले नाही, असे ते म्हटले. मागील सरकारने कायदा बोगस केला, असे महाविकस आघाडी सरकारचे म्हणणे आहे.

सरकारची ही राजकीय भांडणे मराठा समाजासाठी नसून राजकीय स्वार्थासाठी सुरूच आहेत. लोकांनी त्यांची प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. तरीही फक्त राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा संपूर्ण खेळ चालू आहे.

तर आम्ही गप्प बसणार नाही!

जर तुम्ही मराठ्यांचा व त्यांच्या आरक्षणाचा खेळ खेळत असाल तरीही आम्ही गप्पच बसावे का? मी सरकारला तीन पर्याय दिले होते. पहिला पर्याय म्हणजे रिव्युपिटिशन दाखल करा. पण कोर्ट ते स्वीकारत नाही. रिट पिटीशनचाही पर्याय होता.

तिसरा पर्याय मागासवर्ग आयोगाचा. हा आयोग स्थापन करून राज्याचा अहवाल राष्ट्रपतींना द्यायचा. राष्ट्रपती तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देईल. तेथून तो संसदेत चर्चेला जाईल.

त्यानंतर तेथून आरक्षणाचा मार्ग निघू शकतो. मात्र, याबाबत काहीच हालचाली होत नाहीत. कोण चुकले कोण बरोबर हे आम्हाला पहायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. ते तुम्ही करू शकता का हेच आम्हाला पहायचे आहे. आमचा तुम्ही खेळ करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.

आम्ही वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. त्यामुळेच १६ जून रोजी मराठा समाजा रस्त्यावर उतरेल. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मोर्चा काढू.वेळ पडली तर कोल्हापूर ते मुंबई लाँग मार्चही काढू. मराठा समाजाची वाताहात होत असताना मी गप्प बसावे असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे.’

संबंधित बातम्या !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here