PM Kisan सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर या ‘ठिकाणी’ संपर्क करा

234

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) सातवा हप्ता केंद्र सरकारने जारी केला आहे.

काही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे पोहोचले नाही आहेत. सध्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेचे एकूण 11 कोटी 45 लाख लाभार्थी आहेत.

यामध्ये उत्तर प्रदेशातील 23 टक्के, पंजाबमधील 22 टक्के, गुजरातमधील 23 टक्के, झारखंडमधील 29 टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे.

या शेतकऱ्यांना पाठवला जाणारा हा शेतकरी सन्मान निधीचा तिसरा हप्ता आहे. छोट्या चुकांमुळे रखडू शकतो तुम्हाला मिळणारा लाभ

-शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

-त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता.

-फार्मर कॉर्नर अंतर्गत edit aadhar details या पर्यायावर क्लिक करा

-आधार क्रमांक आणि Captcha Code टाकून सबमिट करा

-याठिकाणी नावामध्ये कोणती चूक असेल तर ती सुधारता येईल

-जर आणखी कोणती चूक असेल तर तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता

तुम्हाला योजनेची रक्कम न मिळाल्यास थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क

या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता.

पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266

पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261

पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011-23381092, 23382401

पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606

पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

ई-मेल आयडी: [email protected]

7 हप्त्यांमध्ये एवढ्या शेतकऱ्यांना मिळाले पैसे

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पोर्टलनुसार, पहिला हप्ता 3,16,01,224 शेतकऱ्यांना मिळाला होता, दुसरा 6,63,16,797, तिसरा 8.75 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता.

चौथा, पाचवा आणि सहावा हप्ता अनुक्रमे 8.94 कोटी, 10.46 कोटी, 10.20 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. तर सातवा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 9.06 कोटी आहे. 31 मार्च 2021 पर्यंत पाठवण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here