शेतकऱ्यांची उपेक्षा करणे भाजपला महागात पडेल | गुलाबराव पाटील

165

जळगाव : दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. पण, केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. 

शेतकऱ्यांची उपेक्षा करणे भाजपला महागात पडेल, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. मंगळवार (दि. २६) रोजी मंत्री गुलाबराव पाटील जळगावात होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. 

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आता देशभरात पसरले आहे. हे आंदोलन आता व्यापक झाले आहे.

मात्र, केंद्रातले भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यपाल हे राज्याचे ‘पाल’ आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, भेट नाकारली, हे चुकीचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते मुख्यमंत्री देखील होते, असेही त्यांनी सांगितले.

आता आदिवासी शेतकरीही या आंदोलनात उतरला आहे. शेतकरी आंदोलनात आदिवासी उतरल्याने हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून ते आदिवासींचे आंदोलन आहे, अशी टीका भाजपकडून सुरू आहे, यावरही त्यांनी टीका केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here