मी फासावर जायला तयार | राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

167

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.

नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला आहे, यावर महेबूब शेख यांनी खुलासा केला आहे.

यासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर मेहबूब शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तरूणीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

शिरूर तालुक्यात दुसरा कोणीही मेहबूब इब्राहिम शेख नावाचा व्यक्ती नाही. कोणी असेल तर पोलिसांनी शोधावं. पण संबंधित महिलेला मी कधीही भेटलो नाही.

दहा अकरा तारखेला मी मुंबईत होतो. तर 17 तारखेला मी माझ्या मूळ गावी असल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे.

महिलांच्याप्रती मला प्रचंड आदर आहे. तसेच माझा याप्रकरणाशी कुठलाही संबंध असला तर मी फासावर जायला तयार आहे.

मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घ्यायला तयार आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here