Crime News बायकोसोबत साडूचे अनैतिक संबंध | शेतमजुराने कुऱ्हाडीने केली दोघांची हत्या

212

Crime News : ग्रामीण भागात साडूच्या भरवश्यावर बायको सोडू नये अशी म्हण आहे, कारण त्यात धोकाच अधिक होण्याची शक्यता असते या अर्थाने ग्रामीण भागातील म्हण असली तरी याला दुजोरा देणारी घटना घडली आहे.

आपल्या बायको आणि साडूच्या अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या एका शेतमजुराने कुऱ्हाडीने दोघांची हत्या केली आहे. ही घटना सफाळे गावात घडली आहे.

दिलीप ठाकूर (45) असं या शेतमजुराचं नाव आहे. त्याची पत्नी संगीता (40) आणि साडू पांडू श्रवणे (42) यांचे एकमेकांशी अनैतिक संबंध होते. यावरून दिलीप आणि संगीतामध्ये वादही होत असत.
रविवारी नेहमीप्रमाणे दिलीप शेतीच्या कामासाठी गेला होता. पण, काम लवकर संपल्याने तो घरी परतला. तेव्हा त्याला घरी संगीता आणि पांडू यांना आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं दिसलं.

त्याचा संताप येऊन कुऱ्हाडीने त्या दोघांवरही वार केले. ते दोघंही या हल्ल्यात ठार झाले. त्यांची हत्या केल्यानंतर दिलीप त्यांच्या मृतदेहांशेजारीच बसून होता.

काही तासांनी जेव्हा त्याचा शेजारी त्याच्या घरी आला, तेव्हा त्याने हे भयंकर दृश्य बघून पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दिलीपला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here