मोलकरणीच्या नादाला लागून एका माणसाने आपल्याच कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मोलकरणी सोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे आतिषने कुटुंबातील आई, वडील, बहीण आणि पत्नी यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आतिष केसरवानी असे ह्या माणसाचे नाव असून हा प्रकार उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे घडलेला आहे. ह्या प्रकरणात आतिष केसरवानी आणि त्याचा साथीदार अनुज श्रीवास्तव याला पोलिसांनी अटक केली आहे तर दोन आरोपी फरार आहेत.
असा केला होता बनाव
गेल्या गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आतिष घरी परतला असता वडील तुलसीदास केसरवानी (६४), आई किरण (६०), बहीण निहारिका (३०) आणि पत्नी प्रियंका (२७) यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहिले.
यानंतर त्याने लगेच पोलिसांना ह्या घटनेबद्दल माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले असता त्यांना चार ज्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.
मात्र पोलिसांनी आपल्या सूत्रधाराच्या माध्यमातून माहिती काढली असता अतिषचे त्यांच्या घरातील मोलकरणीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली, त्यानंतर पोलिसांनी आपली सुई अतिषच्या दिशेने वळवली, त्यानंतर ह्या पूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
कशामुळे आणि का झाला हा प्रकार ?
काही दिवसांपूर्वी घरात काम करणाऱ्या मोलकरणीशी अनैतिक संबंधाबाबत आतिषच्या घरात वादविवाद झाला होता. यानंतर आतिषने त्याचा मित्र अनुज श्रीवास्तव यांच्यासह घरच्यांना मारण्याचा कट रचला.अनुजमार्फतच भाडोत्री माणसांना बोलवण्यासाठी ८ लाखांची सुपारी देण्यात आली. या हत्येमध्ये एकूण चार जणांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आतिष आणि अनुज यांना अटक केली आहे. तर हा हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पाच पोलीस पथके त्यांचा शोध घेत आहेत.
आतिशने ८ लाखांची सुपारी मित्र अनुप, त्याचे काका बच्चा श्रीवास्तव आणि अजून एकाला दिली. ८ लाखांपैकी ७५ हजार रुपये आतिशने दिले होते. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना चाकूने गळा आवळून खून करण्यात आला.