उत्तर प्रदेशमधील हमीरपुरात एका काकू आणि पुतण्याची हत्या झाली आहे. दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेले आढळले. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मात्र या महिलेच्या मुलांनी पोलिसांना सांगितले की दोघांचे प्रेमसंबंध होते. ती महिला 35 वर्षांची आणि मुलगा 25 वर्षांचा होता. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या अनैतिक संबंधात होते.
सदरील प्रकरणातील मयत पुतण्या काकांच्या घरी यायचा. काका घरी नसतानाही दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. महिलेच्या पतीला याची माहिती मिळाली होती, तसेच मुलांनी त्यांना बर्याचदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते.
यामुळे तिचे नवरा आणि मुलांमध्ये भांडणहि झाले होते. परंतु ती पुतण्याशी असलेले अनैतिक संबंध रोखण्यास तयार नव्हती. बुधवारी सकाळी ही महिला अचानक घरातून गायब झाली.
तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता तिला व तिचा पुतण्याचा मृतदेह झाडावर साडीच्या सहाय्याने लटकलेला आढळला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी केली जात आहे.