पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी 25 एप्रिलला होणारी परीक्षा कोरोनामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
● शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि आठवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली आहे.
● राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.