लातूर : जिल्हयात काही ठिकाणी गारपीट / वेगाचा वारा, नैसर्गीक आपत्ती घडण्याची व त्यामुळे फळ पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीकडे कळविण्या बाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत हवामन आधारीत फळपिक विमा योजने मधील विमाधारक शेतकऱ्यांना वेगाचा वारा व गारपीट या जोखीमेच्या बाबीकरीता वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.
यासाठी विमा संरक्षित पिकांबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासांचे आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची पुर्वसुचना नोंदवण्यासाठी प्राधान्याने क्रॉप इन्श्युरंन्स मोबाईल अॅपव्दारे विमा कंपनी / कृषि / महसुल विभाग / बँक किंवा टोल फ्री क्रमांकाव्दारे देण्यात यावी.
आपला तक्रार अर्ज विमा कंपनीच्या [email protected]/[email protected] या इमेलव्दारे पाठवावा व अधिक माहितीसाठी अविनाश खेडकर, जिल्हा प्रतिनिधी एच.डी.एफ.सी.ॲग्रो जनरल इन्श्युरंन्स कंपनी मो. क्र.8888436054 यांचेशी किंवा नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.