निलंगा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमधील ४२८ जागेसाठी दि. ४ जानेवारी रोजी २४९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने ९२३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
तालुक्यातील नणंद, माळेगाव (जे), कोकळगाव, उस्तुरी, वाक्सा, माळेगाव (क), टाकळी, पिरुपटेलवाडी, केळगाव, हाडगा, ताजपुर, गौर, सावरी, बसपुर, हंद्राळ, वळसांगवी, होसुर, शिरोळ, नदीवाडी,
हंचनाळ, तगरखेडा, डांगेवाडी, अंबुलगा (मेन), आनंदवाडी (गौर), शिऊर, आनंदवाडी (अं.बु), डोंगरगाव (हा), कासारशिरसी, रामतीर्थ, सिंगनाळ, गुऱ्हाळ, लांबोटा, ताडमुगळी, सरवडी,
बडुर, औराद शहाजनी, जाजनूर, मुदगड (ए), ढोबळेवाडी /माचरटवाडी, खडकउमरगा, वाडीशेडोळ, हासोरी (बु), वांजरवाडा, बामणी, कासार बालकुंदा, कोराळी, अंबेगाव, सांगवी (जे),
हणमंतवाडी या ४८ गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत.
दि ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन छाननीत एकुण ११८९ नामनिर्देशन पत्रापैकी फक्त १७ नामनिर्देशन अवैध ठरल्याने ११७२ नामनिर्देशन वैध ठरले.
त्यातील दि. ४ जानेवारी रोजी दुपारी तीन पर्यंत २४९ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्याने ९२३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
दुपारी तीन नंतर प्रत्येक उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे.