लष्करी कर्मचारी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बदलीनंतर आपली वाहने परराज्यात घेऊन जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
मात्र रस्ते वाहतूक मंत्रालयांच्या नव्या निर्णयामुळे आता परराज्यात वाहन हस्तांतर करणे सोईस्कर होणार आहे.रस्ते वाहतूक मंत्रालय वाहन नोंदणीची नवीन प्रणाली प्रस्तावित करीत आहे.
‘इन’ सिरीजच्या रजिस्ट्रेशनमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन दुसर्या राज्यात हलवले जात असताना कागदी कार्यवाहीपासून सुटका मिळणार आहे.
अशा नियमांची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती, कारण लष्करी कर्मचारी किंवा सरकारी कर्मचार्यांची पोस्टिंग वारंवार बदलत असते.
यामुळे त्यांना नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. आता समस्येपासून सुटका होईल.
यांना मिळणार ही सुविधा
सिरीज IN अंतर्गत वाहन नोंदणी सुविधा केवळ संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकारे, केंद्र / राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या / संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीच असेल.