प्रतिकूल परिस्थितीतही ऑनलाईन अध्यापन करण्याचा तंत्रस्नेही शिक्षकांचा निर्धार
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा व वासंतिक वर्गाचे उद्घाटन ऑनलाईन संपन्न झाले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी पालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% ठेवा असे सांगत विद्यालयाचे शिक्षक मेहनती असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
याप्रसंगी 350 पालकांनी आपली उपस्थिती नोंदवली. सौ कुलकर्णी, सचिन हळ्ळे, कपिल बिराजदार, हरिभाऊ पांचाळ, निलंगे, कांबळे सर आदि पालकांनी मनोगत व्यक्त केले.
पर्यवेक्षक सौ अंबुताई दीक्षित यांनी पालकांना कोणती काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
याशिवाय सर्व शिक्षक तंत्रस्नेही असून ऑनलाईन वर्गाचे विशेष प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. पालकांच्या मनातील प्रश्नांचे शंका समाधान मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांनी समर्थपणे केले.
यावेळी त्यांनी पालकांना पाल्याच्या शिक्षणासाठी दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.तसेच वासंतिक वर्गात 30% अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड आणि पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांची मेळाव्याला विशेष उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक स्मिता मेहकरकर व स्वागत परिचय विजय दीक्षित यांनी करून केले. वैयक्तिक गीत प्रीती शेंडे यांनी सादर केले. सविता कोरे आणि प्रीती शेंडे यांनी अनुक्रमे विज्ञान आणि इंग्रजी विषयांचे मार्गदर्शन केले.
आभार दहावी सहप्रमुख रामेश्वर मलशेटे यांनी मानले. सूत्रसंचालन दहावी प्रमुख कृष्णा मारावार यांनी केले. तंत्र निर्देशन चेतन धुरंधरे यांनी केले. केरबा नेमट यांनी शांती मंत्र सांगितला.