जळकोट येथील कोरोना रुग्णसंख्येत वाढ | Covid सेंटर पुन्हा सुरु करण्याची मागणी !

234
latur - jalkot-coronavirus-positive-cases-

आत्तापर्यंत ५१४ एकूण कोराेना रुग्णसंख्या असून, त्यापैकी ४६७ रुग्ण बरे झाले आहेत. १६ जणांचा मृत्यू झाला आहे. १९ मार्चराेजी माळहिप्परगा येथी एकाचा मृत्यू झाला. 

३१ कोराेना रुग्णापैकी काहींना होम क्वाॅरंटाईन तर काहींना उदगीरच्या सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. जळकोटात यापूर्वी सुरु असलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे.

जळकोट येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी जळकोटसह तालुक्यातील नागरिकांतून हाेत आहे. जळकोट तालुक्यातील सर्व पक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहे.

India sees new daily high with 15,968 more virus cases

मार्चमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केली आहे.

कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांच्याशी संपर्क केला असता, कोविड सेंटर येथे पाण्याची व्यवस्था नाही. परिणामी, सध्या एका वस्तीगृहात तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here