India Corona Cases Latest Update | भारतातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक, दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट 

222

दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

मुंबई : देशातील अनेक राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे देशातील वाढत्या कोरोना रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे.

गेल्या दोन दिवसात भारतातील कोरोनाबाधितांमध्ये (India Corona Cases) घट झाली आहे. भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 2 कोटी 02 लाख 82 हजार 833 पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे 3,449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 2 लाख 22 हजार 408 इतका झाला आहे.

तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3 लाख 20 हजार 289 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 इतकी झाली आहे.

सद्यस्थितीत राज्यात 34 लाख 47 हजार 133 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

India reports 3,57,229 new COVID19 cases, 3,20,289 discharges and 3,449 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 2,02,82,833
Total recoveries: 1,66,13,292
Death toll: 2,22,408
Active cases: 34,47,133

Total vaccination: 15,89,32,921 pic.twitter.com/Zr1mimN4vH

— ANI (@ANI) May 4, 2021

(India Corona Cases Latest Update)

दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट 

भारतात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. देशात 2 मे रोजी 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल 3 मे रोजी 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले होते.

तर गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 35 हजार 259 रुग्णांची घट पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रूग्ण – 3,57,229
देशात 24 तासात मृत्यू – 3,449
देशात 24 तासात डीस्चार्ज -3,20,289
एकूण रूग्ण – 2,02,82,833
एकूण मृत्यू – 2,22,408
एकूण डीस्चार्ज – 1,66,13,292
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 34,47,133
आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -15,89,32,921 (India Corona Cases Latest Update)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here