India Corona Update | दिलासादायक : देशात गेल्या 24 तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद

197

काही दिवसांपासून देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वीस हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 505 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण वाढीच्या उद्रेकानंतर गेल्या 24 तासांत समोर आलेली हि आकडेवारी दिलासादायक आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 40 हजार 470 एवढी झाली आहे.

त्यापैकी 99 लाख 46 हजार 867 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला देशात 2 लाख 43 हजार 953 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

गेल्या 24 तासांत 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 49 हजार 649 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे. मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 557 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.19 टक्के एवढं आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 56 लाख 35 हजार 761 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 7 लाख 35 हजार 978 नमूने रविवारी (दि.3) तपासण्यात आले आहेत.

 

मागील पाच ते सहा दिवसांपासून देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वीस हजारांपेक्षा कमी आहे. तसेच बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अडिच लाखांच्या आत आली आहे. सध्या देशात 2 लाख 43 हजार 953 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here